सामनाच्या अग्रलेखातून उदयनराजेंचा अपमान झाला नाही – मुख्यमंत्री 

टीम महाराष्ट्र देशा : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर शनिवारी साताऱ्याचे राष्ट्रवादी कॉंग्रेस खासदार उदयनराजे भोसले यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. याच पार्श्वभूमीवर ‘सामना’मधून भाजपचे नेते उदयनराजे भोसले यांना शिवसेनेनी भाजपमध्ये आल्यावर स्टाईल मारता येणार नाही असं म्हटले होते.

याविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाष्य केले आहे. त्यांनी ‘सामना मध्ये लिहलेला अग्रलेख हा शुद्ध मराठीत लिहंलेला आहे. त्यामध्ये कुठेही उदयनराजेंचा अपमान करण्यात आलेला नाही. उदयनराजे हे आपला माणूस आहे. त्यामुळे आपल्या माणसाकडून काही अपेक्षा ठेवण्यात गैर काय? असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.

तसेच पुढे बोलताना उदयनराजे हे मुक्त विद्यापीठ आहेत. कॉलर उडवणे हे त्यांची स्टाईल आहे. त्यांना जिथं वाटतं तिथं ते कॉलर उडवतात. त्यांच्यासारखं प्रत्येकाला जमत नाही. ते व्यासपीठावर असले की तसं करत नाहीत. ते जनतेमध्ये, तरुणांमध्ये असल्यानंतरच तसं करतात. कारण, त्यांची ही स्टाईल तरुणाईला आवडते. मला कॉलर उडवणं जमतं का, अन् ते जमणारही नाही असं विधान केले आहे.

दरम्यान सामनाच्या अग्रलेखात शिस्त, तत्त्व, संस्कार, नीतिमत्ता व साधनशुचिता या पंचसूत्रीवर भाजपचा डोलारा उभा आहे. शिट्या मारणे, कॉलर उडवणे, इतर नाट्यछटा करणे हे असले प्रकार भाजपच्या शिस्तीत बसत नाहीत, असं म्हणण्यात आले आहे.