मुंबई का तुंबली ? मुख्यमंत्री म्हणतात …पाऊस जास्त पडला म्हणून नाले भरले

blank

मुंबई – पालिकेच्या आपत्कालीन विभागाला भेट देऊन शहरातील व्यवस्थापनेचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आढावा घेतला. रात्रीपासून मुंबई शहरात पावसाने धुमाकूळ घातला आहे. शहरातील अनेक सखल भागात पाणी साचलं आहे. विरोधकांकडून मनपा आणि सेनेला लक्ष्य केले जात असताना फडणवीस यांनी मात्र मुंबई महापालिकेची पाठराखण केली आहे. मुख्यमंत्र्यांनी मुंबई महापालिकेची पाठराखण केली आहे.

पाणी तुंबलंय की नाही याच्या राजकारणात न जाता, मुंबईकरांना तातडीने दिलासा कसा देता येईल हे पाहणं महत्त्वाचं आहे. नालेसफाई झाली नाही असं म्हणता येणार नाही. पावसाचं प्रमाण अत्यंत जास्त आहे, त्यामुळे नाले दुथडी भरुन वाहत आहेत. तसेच हायटाईड असल्याने पाण्याचा निचरा होण्यास अडचण होतेय असं सांगत मुख्यमंत्र्यांनी त्यानंतर बोलताना त्यांनी पालिकेचा बचाव केला.