साध्वीने एकावर केला होता चाकूने हल्ला ; छत्तीसगडच्या मुख्यमंत्र्यांचा दावा

टीम महाराष्ट्र देशा : नुकतेच साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांनी शहीद हेमंत करकरे यांच्याबद्दल केलेल्या विधानामुळे विरोधकांनी टीकेची झोड उठवली आहे, सामान्य नागरिकही समाज माध्यमांवर साध्वीच्या बेताला वक्तव्याचा निषेध करत आहेत.

Loading...

मालेगाव बॉम्बहल्ल्यातील आरोपी साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यावर छत्तीसगडचे मुख्यमंत्री भुपेंद्रसिंह बघेल यांनी गंभीर आरोप केले आहेत. साध्वीने छत्तीसगडमध्ये एकावर चाकूने हल्ला केला होता, तर गाडीवरून हाणामारीही केल्याचा आरोप त्यांनी केला आहे. छत्तीसगडच्या बिलाईगडमधील टुंड्रायेथील प्रचारसभेत त्यांनी हा आरोप केला.

काय म्हणाले भूपेंद्र बघेल ?

साध्वी प्रज्ञा सिंहला छत्तीसगडशिवाय कोण जास्त ओळखू शकेल. इथे ती तिच्या बहीनीच्या नवऱ्यासोबत राहत होती. एका क्षुल्लक कारणावरून तिने शैलेंद्र देवांगन याला चाकू मारला होता. तेथे असलेल्या लोकांनी हस्तक्षेप केला अन्यथा शैलेंद्रचा जीव गेला असता. कवर्धामध्येही तिने गाडीवरून मारहाण केली होती. असे उमेदवार देऊन भाजपा कोणता चेहरा दाखवू पाहत आहे. भाजपाला योग्य उमेदवार मिळत नाहीत यामुळेच ते दहशतवादी कारवायांमध्ये असलेले उमेदवार उभे करत आहे.Loading…


Loading…

Loading...