राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीला मुख्यमंत्र्यांची ‘ऑनलाईन’ उपस्थिती

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीला मुख्यमंत्र्यांची ‘ऑनलाईन’ उपस्थिती

Uddhav Thackeray

मुंबई: राज्य मंत्रिमंडळाची बैठक आज दिनांक २५ नोव्हेंबर रोजी पार पडली. ही बैठक सह्याद्री अतिथीगृह येथे घेण्यात आली होती. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांची प्रकृती बरी नसल्याने त्यांनी या बैठकीला ऑनलाईन उपस्थिती लावली होती. मुख्यमंत्री हे एच .एन.रिलायन्स रुग्णालयातून दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभागी झाले होते. बैठकीच्या प्रारंभी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी केला.

या बैठकीत कोरोना परिस्थिती, लसीकरण, पीक पाणी परिस्थिती आदि विषयांवर चर्चा करण्यात आली. परिवहन मंत्री अनिल परब यांनी देखील एसटी संपासंदर्भात राज्य शासनाने उचललेल्या पावलांची माहिती बैठकीत उपस्थितीत मंत्रिमंडळाला दिली. ज्या जिल्ह्यांमध्ये कमी लसीकरण झाले असेल त्या जिल्ह्यांतील लसीकरणाचा वेग वाढवण्यात यावा त्याच सोबत यूरोपमध्ये कोरोनाची परिसतिथी पुन्हा एकदा बिकट होत चालली आहे त्या पार्श्वभूमीवर आपणही काळजी घ्यावी, या विषयांवर चर्चा करण्यात आली.

यावेळी मुख्यमंत्र्यांनी आपल्या भावना देखील व्यक्त केल्या. ते म्हणाले की, या आजारपणात आपण सर्व जण सहकार्य करीत आहात त्यासाठी मनापासून धन्यवाद. शस्त्रक्रियेनंतर डॉक्टरांच्या देखरेखीखाली फिजीओथेरपी व्यवस्थित सुरू आहे, असेही ते म्हणाले. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना प्रकृती अस्वास्थ्यामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे समजल्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या तब्येतीची चौकशी केली तसेच लवकर बरे व्हावेत अशी सदिच्छा व्यक्त केली.

महत्वाच्या बातम्या: