मुंबई : सध्या शिंदे गट आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे गट यांच्यात चांगलंच शाब्दिक युद्ध सुरू आहे. दरम्यान शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी शरद पवारांवर गंभीर आरोप केला आहे. नारायण राणे आणि छगन भुजबळ यांना शिवसेनेतून बाहेर पडण्यास पवारांनी मदत केली, असा आरोप केसरकर यांनी केलाआहे. यावरूनच राष्ट्रवादीचे नेते क्लाईड क्रास्टो (Clyde Crasto) यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
“शरद पवार साहेबांवर टीका करून फुकट प्रसिद्धी मिळवणार्यांच्या यादीमध्ये दीपक केसरकर यांचे नाव जोडले गेले आहे. केसरकर मोठ्या मंत्रिपदाच्या आशेने स्वतःची प्रसिद्धी करत आहेत. पडळकर व सदाभाऊ खोत हे देखील टीका करतात पण त्याचा फायदा होत नाही हे केसरकर यांनी लक्षात ठेवावे.”, असा टोला केसरकर यांनी ट्वीट करत लगावला आहे.
आदरणीय शरद पवार साहेबांवर टीका करून फुकट प्रसिद्धी मिळवणार्यांच्या यादीमध्ये #DeepakKesarkar यांचे नाव जोडले गेले आहे.
केसरकर मोठ्या मंत्रिपदाच्या आशेने स्वतःची प्रसिद्धी करत आहेत.
पडळकर व सदाभाऊ खोत हे देखील टीका करतात पण त्याचा फायदा होत नाही हे केसरकर यांनी लक्षात ठेवावे.— Clyde Crasto – क्लाईड क्रास्टो (@Clyde_Crasto) July 14, 2022
केसरकर काय म्हणाले होते?
महाराष्ट्रात जेव्हा जेव्हा शिवसेना फुटली तेव्हा त्यामागे शरद पवार होते, असा आरोप केसरकर यांनी केला आहे. शिवसेना का फोडली? बाळासाहेब जिवंत होते तेव्हा त्यांना यातना का दिल्या? याचे उत्तर शरद पवारांनी महाराष्ट्रातील जनतेला द्यावे, असेही केसरकर म्हणाले. मी प्रत्येक गोष्टीचा साक्षीदार आहे. मी राष्ट्रवादीत असताना शरद पवार मला विश्वासात घेऊन सांगायचे. नारायण राणेंना बाहेर पडण्यासाठी शरद पवारांनी मदत केली होती. मात्र त्यांनी कोणत्या पक्षात जावे. ही अट ठेवली नसल्याचे शरद पवारांनी मला सांगितल्याचे केसरकर म्हणाले होते.
महत्वाच्या बातम्या:
- Shahajibapu Patil : भविष्यात शिंदे-ठाकरे एकत्र येणार?; शहाजीबापू म्हणाले…
- Nilesh Rane :”दीपक केसरकर लिमिटमध्ये राहा…”, ‘त्या’ वक्तव्यानंतर निलेश राणेंचा इशारा
- IND vs ENG : भारतासाठी वनडे क्रिकेटमध्ये मोहम्मद शमीच्या नावावर नव्या विक्रमाची नोंद; पाहा VIDEO!
- Amol Mitkari : “उगाच आम्हाला तोंड उघडायला लाऊ नका, हवेतून खाली या”; अमोल मिटकरींनी केसरकरांना सुनावलं!
- Amol Mitkari : “उगाच आम्हाला तोंड उघडायला लाऊ नका, हवेतून खाली या”; अमोल मिटकरींनी केसरकरांना सुनावलं!
>>> आमच्या सोशल मीडिया फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील व्हा! फेसबुक & टेलिग्राम ग्रुप <<<
>>> आपल्या परिसरातील महत्त्वाच्या समस्यांना वाचा फोडून, तुमच्या बातमीने बदल घडवा. { बातमी पाठवा SUBMIT NEWS } <<<