मुंबई : काँग्रेस (Congress) नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांची भारत जोडो नुकतीच तामिळनाडू, केरळमधील प्रवास पूर्ण करुन कर्नाटक राज्यात पोहोचली आहे. ‘भारत जोडो’ यात्रेदरम्यान काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी कर्नाटकातील म्हैसूर येथे मुसळधार पावसात सभा घेतली. यावरुन राष्ट्रवादी पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या पावसातील सभेची आठवण झाली. यावरुनच राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते क्लाईड क्रास्टो (Clyde Crato) यांनी ट्विट करत प्रतिक्रिया दिली आहे.
क्लाईड क्रास्टो यांची प्रतिक्रिया :
वेळेने सिद्ध केलं आहे आणि वेळ सिद्ध करत राहिल, जेव्हा जेव्हा पाऊस पडतो तेव्हा देव आशिर्वाद देतो त्यामुळे लवकरच विरोधी छावणीत वादळ येईल, अशी प्रतिक्रिया क्लाईड क्रास्टो यांनी दिली आहे. याचं ट्विट देखील त्यांनी केलं असून या ट्विटमध्ये राहुल गांधींच्या सभेसोबत शरद पवारांच्या सभेचा देखील फोटो त्यांनी शेअर केलं आहे.
पाहा ट्विट :
'Time has Proved and Time will Prove'
When the Rain Gods decide to Bless you, there will soon be a Storm in the Opposition Camp.#SharadPawar #RahulGandhi pic.twitter.com/zkASBjjZbH— Clyde Crasto – क्लाईड क्रास्टो 🇮🇳 (@Clyde_Crasto) October 2, 2022
सातारा येथे 2019 मध्ये लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी भरपावसात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सभा घेतली होती. त्या सभेचे स्मरण कालच्या राहुल यांच्या सभेने सर्वांना झाले. कर्नाटकमध्ये राहुल गांधी यांनी काल म्हैसूरमध्ये उपस्थित समुदायाला भरपावसात संबोधित केलं. राहुल गांधी यांच्या सभेचं वैशिष्ट्य म्हणजे भरपावसात त्यांनी संवाद साधला. आपल्याला भारताला जोडायचं असल्याचं ते म्हणाले.
बेरोजगारी आणि रोजगाराचा मुद्दा काँग्रेस मांडत राहील, असं राहुल गांधी यांनी म्हटलं. भरपावसात देखील राहुल गांधी यांच्या सभेला उपस्थितांनी प्रतिसाद दिला. आपल्याला भारताला जोडायचंय, असंही ते म्हणाले. काँग्रेस पक्षानंं त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरुन हा व्हिडिओ शेअर केला आहे. राहुल गांधींनी देखील तो व्हिडिओ ट्विट केला आहे. राहुल गांधींची पावसातील सभा मात्र चर्चेचा विषय ठरलीय
लोक तिरस्काराची भाषा करतील तितकंच आपल्याला देशाला जोडायचं आहे, असं राहुल गांधी म्हणाले. आपण बेरोजगारी आणि रोजगाराच्या मुद्यावर आवाज उठवत राहू, असं ते म्हणाले. तुम्ही भर पावसात सभेला उपस्थित राहिलात त्याबद्दल तुमचे आभार मानतो, असंही ते म्हणाले.
महत्वाच्या बातम्या :
- Kishori Pednekar | ‘दोन दसरा मेळावा होत असल्याचे दु:ख’ म्हणणाऱ्या रामदास कदमांवर किशोरी पेडणेकरांचा पलटवार म्हणाल्या…
- Hair Care Tips | कढीपत्त्याने केस नैसर्गिकरित्या करा काळे, जाणून घ्या प्रोसेस
- Girish Mahajan | एकनाथ शिंदेंच्या दसरा मेळाव्याला भाजप नेत्यांची उपस्थिती? गिरीश महाजनांनी दिलं उत्तर, म्हणाले…
- Raosaheb Danve : “तुम्ही आहात एमआयएमचे पण वाटता भाजपचे”; दानवेंचा इम्तियाज जलील यांना टोला
- Eknath Shinde vs BJP | भाजपच्या त्रासाला कंटाळून एकनाथ शिंदेंनी भर स्टेजवर दिला होता राजीनामा! जाणून घ्या काय आहे प्रकरण?
८ लाख सैनिक असूनही… तुम्ही नालायक आणि निकम्मे आहात; शाहिद आफ्रीदीची मोदी सरकार, लष्करावर टीका