मुंबई: एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेशी बंड करत मोठा डाव खेळला. त्यांच्याबरोबर सेनेच्या इतर आमदारांनीही बंड पुकारला आहे. सध्या एकनाथ शिंदे यांच्याकडे ५० आमदार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. यावरूनच केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी ट्वीट करत या आमदारांचे कौतुक करून सेनेवर निशाणा साधला होता. यावर आता राष्ट्रवादीचे नेते क्लाईड क्रास्टो (Clyde Krasto) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
“नारायण राणे यांनी ट्विटद्वारे बंडखोर आमदारांचे समर्थन करून हिंमत दाखवली त्याबद्दल त्यांचे कौतुक. भाजप हे षडयंत्र रचत आहे याचा हे ट्विट म्हणजे आणखी एक पुरावा आहे. बाकी त्यांच्या ट्विटमध्ये जी वाक्यं आहेत त्यावर योग्य वेळी, योग्य उत्तर देऊ.”, असा इशारा क्लाईड क्रास्टो यांनी ट्वीट करत दिला आहे.
नारायण राणे जी यांनी ट्विटद्वारे बंडखोर आमदारांचे समर्थन करून हिंमत दाखवली त्याबद्दल त्यांचे कौतुक.
भाजप हे षडयंत्र रचत आहे याचा हे ट्विट म्हणजे आणखी एक पुरावा आहे.
बाकी त्यांच्या ट्विटमध्ये जी वाक्यं आहेत त्यावर योग्य वेळी, योग्य उत्तर देऊ.#NarayanRane #BJP #EknathShinde— Clyde Crasto – क्लाईड क्रास्टो (@Clyde_Crasto) June 24, 2022
नारायण राणेंचा शरद पवारांना इशारा-
“सन्माननीय नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे हे माझे जुने सहकारी व मित्रही आहेत. ते व त्यांचे सहकारी सरकारमधून बाहेर पडून राज्याबाहेर आहेत. त्यांची संख्या पाहता आताच्या मुख्यमंत्र्यांनी शोभायात्रा काढली, हा पळपुटेपणा व स्वार्थीपणा आहे. तसेच शरद पवार (Sharad Pawar) बंडखोर आमदारांना धमक्या देत आहेत, ‘सभागृहात येऊन दाखवा’, ते येणारच आहेत. ते येणार आणि त्यांच्या मनाप्रमाणे मतदान करणार. त्यांच्या केसालाही धक्का लावल्यास घर गाठणे कठिण होईल,” असा इशारा नारायण राणे यांनी शरद पवारांना दिला आहे.
तसेच “आघाडी सरकार हे सोयीसाठी व स्वार्थासाठी तयार झालेले सरकार आहे, त्यामुळे कामाच्या व कार्याच्या बढाया मारू नयेत. काहीजणांनी अनेक वेळा बंडखोरी केली. त्या बंडखोरीचा इतिहास उभ्या महाराष्ट्राला माहीत आहे. नको त्या क्षणी नको त्या वयात मान्यवरांना धमक्या देणे शोभत नाही”, असा टोला देखील नारायण राणे यांनी शरद पवारांना लगावला आहे.
महत्वाच्या बातम्या:
- TNPL 2022 : धोनीचा सहकारी खेळाडू ठरला ‘मंकडींग’चा बळी; रागात येऊन केलं ‘असं’ कृत्य; पाहा VIDEO!
- Sanjay Raut : “आम्ही हार मानणार नाही ज्यांना…”, संजय राऊतांचा इशारा
- Raftaar Singh : प्रसिद्ध रॅपर रफ्तार सिंग घेणार घटस्फोट
- INDW vs SLW : पहिल्या टी-२० सामन्यातील विजयानंतर हरमनप्रीत खुश! म्हणाली…
- Deepali Syyed Tweet : “आदित्य ठाकरे व श्रिकांत शिंदे यांनी…” ; दीपाली सय्यद यांचे ट्वीट करत आवाहन