जीएसटीच्या जाचक अटींविरोधात व्यापाऱ्यांचा बंद

GST officials crack down on tax evaders, recover Rs 25 lakh fine

हिंगोली : जीएसटीतील जाचक अटी तसेच त्यातील तरतुदीमुळे व्यापाऱ्यांचे अतोनात नुकसान होत आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांनी शुक्रवारी बंद पाळण्याचा इशारा दिला आहे. यातच इन्सपेक्टर राज, जीएसटी विभागाचा हम करे सो कायदा या मनोवृत्ती तसेच जीएसटी कार्यालयाच्या चुकीचा व्यापाऱ्यांना फटका बसत आहे. त्यामुळे या सर्व प्रकाराच्या विरोधात शुक्रवारी व्यापारी बंद पुकारणार आहेत.

शुक्रवारी हिंगोली येथे कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स या किरकोळ व्यापाऱ्यांच्या देशपातळीवरील एकमेव संघटनेने भारत बंद पुकारला आहे. यावेळी व्यापारी जाचक अटी व तरतुदींचा पुर्नविचार करुन सरळीकरण करावे, ही मागणी करत आहेत. यामध्ये हिंगोली जिल्हा व्यापारी महासंघ, मराठवाडा चेंबर ट्रेड अँड कॉमर्स संघटना प्रणीत हिंगोली जिल्हा व्यापारी महासंघ सहभाग घेणार आहे.

दरम्यान शुक्रवारी कॉन्फेडशेन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स यांच्या वतीने पुकारलेल्या बंदमध्ये महाराष्ट्र टँकर मोटार ट्रांन्स्पोर्ट असोशिएशन, महाराष्ट्र चेंबर्स अँड कॉमर्ससह अनेक छोट्या – मोठ्या संघटना या मध्ये सहभागी होणार असल्याची माहिती नुकत्याच झालेल्या बैठकीत देण्यात आली. दरम्यान या संपामध्ये सहभागी होण्याचे आवाहन मराठवाडा चेंबर्स ट्रेड अँड कॉमर्स हिंगोलीचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार गजानन घुगे यांच्या यांची कैलासचंद्र काबरा, प्रशांत सोनी यांनी भेट घेतली.

यावेळी दोघांनी आमची संघटना या बंद मध्ये सहभागी होणार असल्याचे आवाहन देखील केले आहे. या वेळी जिल्हा कर सल्लागार संघटनेने देखील शुक्रवारी होणाऱ्या बंदला पाठींबा देणार असल्याचे जिल्हाध्यक्ष संदीप पतंगे यांनी सांगितले. या वेळी झालेल्या बैठकीत सर्व व्यापाऱ्यांनी एकमताने सहभागी होण्याचे ठरवले आहे.

महत्वाच्या बातम्या