महाराष्ट्र बंद : आमदार त्र्यंबक भिसेंच्या गाडीवर दगडफेक

टीम महाराष्ट्र देशा :  सकल मराठा समाजाच्या वतीने गुरुवारी पुकारण्यात आलेल्या महाराष्ट्र बंदला हिंसक वळण लागले आहे. लातूरमध्ये आमदार त्र्यंबक भिसेंच्या गाडीवर दगडफेक करण्यात आली आहे. संतप्त आंदोलकांनी धक्काबुक्की देखील केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

दरम्यान, सकल मराठा समाजाच्या वतीने गुरुवारी पुकारण्यात आलेल्या महाराष्ट्र बंदला पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर हिंसक वळण लागले. मोर्चाची सांगता झाल्यानंतर काही मराठा समाजातील आंदोलनकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या भिंतीवरुन चढत कार्यालयात तोडफोड केली.

सकाळपासून पुकारण्यात आलेल्या बंदला शहरात दुकाने, बाजारपेठा, सार्वजनिक वाहतुक व्यवस्था उत्स्फूर्तपणे बंद ठेवत कडकडीत बंद पाळण्यात आला होता. ठिकठिकाणी मराठा समाजातील तरुणांनी दुचाकीवरील रॅली, घोषणाबाजी करण्यात आली.

आंदोलन शांततेत करावं असं आवाहन कालच करण्यात आलं होतं मात्र आचारसंहितेची अंमलबजावणी होताना दिसत नसल्याचे चित्र आहे. जमावाने जिल्हाधिकारी कार्यालयाचे प्रवेशद्वार तोडल्याची देखील माहिती समोर आली आहे.

‘महाराष्ट्र बंद’ला राज्यभर प्रतिसाद