महाराष्ट्र बंद : सुरक्षेचा उपाय म्हणून इंटरनेट सेवा बंद

पुणे – मराठा क्रांती मोर्चाच्या राज्यभरातील बंदच्या पार्श्वभूमीवर सुरक्षेचा उपाय म्हणून इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे. मागील काही घटनांमध्ये अफवा पसरण्यामध्ये सोशल मीडियामधील फेक न्यूज कारणीभूत ठरल्या आहेत. त्यामुळे राज्यभरात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी प्रशासनाकडून कडक उपाययोजना करण्यात येत आहेत.

दरम्यान,आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाजाकडून पुकारण्यात आलेल्या महाराष्ट्र बंदला पुण्यात सुरुवात झाली असून शहरातील बहुतांश भाग पूर्ण बंद आहे. शिवाजीनगर आणि स्वारगेट बस स्थानकावरील बस सेवा बंद असून संपूर्ण शहरात आणि संवेदनशील भागात पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.

वीजदर निश्चितीकरणासाठी पुण्यात गुरुवारी जाहीर सुनावणी

मराठा आंदोलकांनी नाही तर बाहेरच्यांनी चाकण पेटवले ?

You might also like
Comments
Loading...