महाराष्ट्र बंद : पुण्यात बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद

पुणे – आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाजाकडून पुकारण्यात आलेल्या महाराष्ट्र बंदला पुण्यात सुरुवात झाली असून शहरातील बहुतांश भाग पूर्ण बंद आहे. शिवाजीनगर आणि स्वारगेट बस स्थानकावरील बस सेवा बंद असून संपूर्ण शहरात आणि संवेदनशील भागात पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.

दरम्यान,पिंपरीच्या डॉ. आंबेडकर चौकात मराठा क्रांती मोर्चाचे ठिय्या आंदोलन सुरु झाले असून मोठ्या संख्येने कार्यकर्ते जमा झाले आहेत. ‘एक मराठा लाख मराठा’, ‘मराठा आरक्षण मिळालेच पाहिजे’, ‘एकच मिशन मराठा आरक्षण’, ‘आमच्या मागण्या मान्य करा, नाहीतर खुर्च्या खाली करा’ अशा घोषणा देत पिंपरी चौकात ठिय्या आंदोलन सुरु करण्यात आले आहे.

‘एक मराठा लाख मराठाच्या घोषणा’ पुणे महापालिका सभागृहात