fbpx

विषय अवघ्या १८१ मतांचा.. जाणून घ्या देशातील सर्वात अटीतटीच्या लढतीबद्दल

EVM

टीम महाराष्ट्र देशा : लोकसभा निवडणुकीचा काल निकाल लागला. भाजपने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात दैदिप्यमान विजय मिळविला. विरोधक चांगली टक्कर देतील अशी आशा निर्माण झाली असताना मोदींच्या लाटेमुळे सर्वच विरोधक भुईसपाट झाल्याचे चित्र आहे.

देशभरात भाजपचे बहुतांश उमेदवार प्रचंड मताधिक्याने जिंकले असताना एका जागेवरची लढत लक्ष्यवेधी ठरली. उत्तर प्रदेशच्या मछलीशहर लोकसभा मतदारसंघातील या जागेवर भाजपच्या बी.पी. सरोज यांनी बसपाच्या के.टी.राम हा आमने सामने होते.या अतिशय लक्ष्यवेधी लढतीत सरोज यांनी के.टी.रामयांना केवळ १८१ मतांनी हरवलं!

या मतदारसंघाच्या मतमोजणीच्या वेळी प्रत्येक राउंडला चित्र पालटत होते. बी.पी. सरोज यांना ४,८८,३९७ मतं मिळाली तर टी. राम यांना ४,८८,२१६ मतं मिळाली. बी.पी. सरोज यांचा विजय देशातला सर्वात कमी मताधिक्याने मिळालेला विजय आहे.