‘चतुर तसेच विश्वासू गोलंदाज’; सुनील गावस्कर बनले ‘या’ भारतीय खेळाडूचे चाहते

gavskar

मुंबई : भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांची कसोटी मालिका कोरोनामुळे स्थगित करण्यात आली. पाचवा कसोटी सामना सुरु होण्याच्या दोन तास आधीच सामना रद्द करण्यात आला. शेवटचा सामना रद्द होण्यापूर्वी भारत मालिकेत 2-1 ने पुढे होता.

भारताला या मालिकेत अनेक सकारात्मक गोष्टी मिळाल्या. रोहित शर्माने आणि जसप्रीत बुमराने खास विक्रमाची नोंद केली. अनेक फलंदाज पुन्हा जुन्या फॉर्मात आले. या मालिकेत जसप्रीत बुमराहने महत्वपूर्ण कामगिरी बजावली होती. जसप्रीत बुमराहने इंग्लंडविरुद्धच्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील चौथ्या सामन्यात आपल्या 100 विकेट पूर्ण केल्या तसेच बुमराह सर्वात जलद विकेट घेणारा भारतीय वेगवान गोलंदाज बनला. तसेच त्याने कपिल देव यांचा देखील रेकॉर्ड मोडला.

बुमराहच्या याच कामगिरीचे गावस्कर यांनी बुमराहची तोंडभरुन स्तुती केली आहे. ‘बुमराह हा अतिशय हुशार गोलंदाज. तो महत्त्वाच्या क्षणी चतुर पद्धतीने गोलंदाजी करतो. तो असा खेळाडू आहे जो कालच्या तुलनेत आज स्वतःला अधिक चांगलं पाहू इच्छितो, मग तो गोलंदाजी असो किंवा फलंदाजी. तुम्ही बघा की त्याने स्वतःला कसे सिद्ध केले आहे आणि जेव्हा तो फलंदाजीला येतो तेव्हा त्याने भारतासाठी धावा कशा केल्या’, अशा शब्दात गावस्करांनी बुमराहचे कौतुक केले आहे.

तसेच गावस्करांनी टाळा एक चांगला क्षेत्ररक्षक देखील म्हंटल आहे. बुमराह सतत सुधारणा करण्यासाठी प्रयत्नशील असतो. तो एक असा खेळाडू आहे ज्यावर आपण कधीही विश्वास ठेवू शकतो. तुम्ही त्याला कठीण परिस्थितीत बॉल द्या, तो म्हणेल ठीक आहे, मी तुम्हाला पाहिजे तसं करुन देतो’, असंही गावस्कर म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या