fbpx

लाचखोर वरिष्ठ लिपिक एसीबीच्या जाळ्यात

IMG १ यवतमाळ

संदेश कान्हु (जिल्हा प्रतिनिधी) यवतमाळ;येथील शिक्षणाधिकारी कार्यालयात कार्यरत असलेल्या वरिष्ठ लिपिकास लाचलुचपत विभागाच्या अधिकाऱ्यांनी गुरुवारी लाच घेताना रंगेहाथ पकडले आहे.उमेश गावंडे असं या लिपिकाच नाव असून २००० रुपयांची लाच घेताना अटक केली आहे .

१ लाख ६२ हजार रुपयांच्या सेवानिवृत्ती नंतर मिळविणाऱ्या ग्रॅच्युटी रकमेकरिता माध्यमिक शिक्षणाधिकारी कार्यालयात वारंवार होणाऱ्या लाचेच्या मागणीने कंटाळून अखेर तक्रारकर्त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालयात तक्रार दाखल केली होती. माध्यमिक शिक्षणाधिकारी कार्यालयात कार्यरत असलेले वरीष्ठ लिपिक उमेश गावंडे यांनी २००० रुपयांची लाचेची मागणी केली होती त्यानुसार यवतमाळ एसीबीचे प्रमुख लव्हरकर यांच्या मार्गदर्शनात सापळा राचन्यात आला. तसेच लाचखोर वरीष्ठ लिपीक उमेश गावंडे यास २००० रुपये लाच घेताना रंगेहात अटक केली असून पुढील कारवाई व तपास सुरू आहे. या घटनेने कर्मचारी वर्गात एकच खडबळ उडाली असून लाचखोरांचे धाबे दणाणले आहेत.