Cleartax- २० भारतीय भाषांमध्ये क्लिअरटॅक्सचा जीएसटी ई-लर्निंग कोर्स

आजपासून देशभरात जीएसटी लागू झाला असतांना व्यापार्‍यांना याच्या विविध पैलूंची सुलभपणे माहिती व्हावी म्हणून क्लिअरटॅक्स या संकेतस्थळाने मराठीसह २० भारतीय भाषांमध्ये जीएसटी ई-लर्नींग कोर्स सादर करण्याची घोषणा केली आहे.

देशातील आघाडीचे प्राप्तीकर परतावे ई-फायलिंग संकेतस्थळ म्हणून ख्यात असणार्‍या क्लिअरटॅक्सने मराठी, गुजराती, कन्नड, तामिळ, तेलगू, बंगाली आदी सहित २० प्रादेशिक भाषांमध्ये आपला जीएसटी ई-लर्निंग कोर्स उपलब्ध करून देण्याचे जाहीर केले आहे. यामुळे इंग्रजी आणि हिंदी भाषेवर प्रभुत्व नसणार्‍यांना त्यांच्या प्रादेशिक भाषेमध्ये जीएसटीसंदर्भातील सर्वसमावेशक माहिती उपलब्ध करून देण्याचा आहे.

क्लिअरटॅक्सच्या या जीएसटी ई-लर्निंग कोर्सची निर्मिती देशातील आघाडीची सीए फर्म आणि प्रशिक्षण अकादमी हिरेगांगे अकादमीच्या सहकार्याने करण्यात आली आहे. क्लिअरटॅक्सचा व्यापक आणि समजण्यासाठी सोपा जीएसटी लर्निंग कोर्स जीएसटीशी संबंधित सर्व शंका आणि चिंतांचे वन स्टॉप सोल्यूशन आहे. या कोर्सचे लक्ष्य व्यापार्‍यांना जीएसटीकरिता तयार करण्याकरिता आवश्यक नियम, विनियम आणि अनुपालन यासंदर्भात माहिती उपलब्ध करून जागरूकता निर्माण करण्याचा आहे.

या सुविधेबद्दल बोलताना क्लिअरटॅक्सचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी अर्चित गुप्ता यांनी सांगितले की, मसुरुवातीला केवळ इंग्रजी आणि हिंदी भाषेत उपलब्ध करून देण्यात आलेल्या या कोर्सला चांगला प्रतिसाद लाभला आणि यामुळेच हा कोर्स विविध प्रादेशिक भाषांमध्ये उपलब्ध करून देण्याच्या मागणीचा जोर वाढला. २० भाषांमधील या कोर्सच्या उपलब्धतेमुळे आता देशभरातील उद्यमी, कर व्यावसायिक आणि सर्व भागधारक यांना जीएसटी विषयक माहिती पुरविण्यासाठी आम्ही सक्षम बनलो आहोत.फ

क्लिअरटॅक्सच्या जीएसटी ई-लर्नींगसाठी आपण येथे क्लिक करून नोंदणी करू शकतात.

पहा: या कोर्सविषयी माहिती देणारा हा व्हिडीओ.