लहान मुलांसाठीच्या लसीकरणाचा मार्ग मोकळा, कोवॅक्सिनच्या आपातकालीन वापराची DCGI कडे शिफारस

लहान मुलांसाठीच्या लसीकरणाचा मार्ग मोकळा, कोवॅक्सिनच्या आपातकालीन वापराची DCGI कडे शिफारस

नवी दिल्ली- देशातील कोरोना लसीकरणाचा कार्यक्रम जोरात सुरु असताना आता लहान मुलांसाठीच्या लसीकरणाचा मार्ग मोकळा झाला आहे. 2 ते 18 वर्षाच्या मुलांना कोरोनाची लस लवकरच मिळणार आहे. भारत बायोटेकने तयार केलेली कोवॅक्सिन लस लहान मुलांना देण्यात यावी अशी शिफारस सब्जेक्ट एक्सपर्ट कमिटीने ड्रग्ज कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाकडे केली आहे.

देशातील 18 वयोगटातील बहुतांशी लोकसंख्येचे जलद गतीने लसीकरण करण्यात येत आहे. अशावेळी लहान मुलांना कधी लस देणार याबाबत काही स्पष्टता नव्हती. आता या विषयातील सब्जेक्ट एक्सपर्ट कमिटीच्या शिफारसीनंतर लहान मुलांवरील लस लवकरच सुरु होण्याची शक्यता आहे.

दरम्यान, भारतातल्या लसीकरण मोहिमेनं काल 95 कोटी 82 लाख मात्रांचा टप्पा ओलांडला गेला .आतापर्यंत 27 कोटी 21 लाखांहून अधिक जणांनी कोरोना प्रतिबंधक लशीच्या दोन्ही मात्रा घेतल्या आहेत.काल दिवसभरात 59 लाख 62 हजारांहून अधिक जणांना लस देण्यात आली.

महत्वाच्या बातम्या