fbpx

कचरामुक्त औरंगाबादसाठी डॉ. पुरुषोत्तम भापकरांचा पुढाकार

bhapakr news

औरंगाबाद: नेहमी वेगवेगळ्या मुद्द्यांसाठी चर्चेत असणारे औरंगाबाद शहर गेले काही दिवस कचऱ्याच्या प्रश्नामुळे चर्चेत आलं आहे. कधी कचऱ्याच्या प्रश्नावरून नागरिक आणि पोलीस आमने आले तर कधी नेते मंडळी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करताना पहायला मिळाले. कचऱ्याचा प्रश्न हा चुटकीसरशी सुटणारा नाहीच मात्र लोकसहभागाशिवाय या प्रश्नावर मात करणे अशक्यच आहे. नेमका हाच धागा पकडत कचरा मुक्त औरंगाबाद शहरासाठी विभागीय आयुक्त डॉ पुरुषोत्तम भापकर यांच्या पुढाकारातून स्वच्छता अभियान सुरु करण्यात येणार असून नागरिकांना यात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आलं आहे.

ज्यावेळी औरंगाबाद शहर वाहतुकीच्या कोंडीचा सामना करत होते त्यावेळी पुरुषोत्तम भापकर महापालिका आयुक्त असताना वाहतुकीच्या कोंडीवर चांगलीच उपाययोजना केली होती. तत्कालीन मनपा आयुक्त भापकर यांनी शहराचा चेहरा- मोहरा बदलण्यासाठी कंबर कसली आणि धडक कारवाई करत मोठ्याप्रमाणावर अतिक्रमणे हटवली त्यामुळे औरंगाबादच्या नागरिकांना मोकळा श्वास घेता आला. आता पुन्हा एकदा औरंगाबाद मधील नागरिक कचऱ्याच्या समस्येचा सामना करत असताना भापकर पुन्हा एकदा पुढे आले आहेत.

purushottam bhapakar news

औरंगाबादची कचऱ्याची समस्या 

नारेगाव येथून कचरा डेपो हलवावा ही मागणी अनेक वर्षापासून आहे. परंतू यावर कोणताही उपाय करण्यात आलेला नाही. खासदार आणि महापौर व इतर पदाधिकां-यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. समांतर पाणी पुरवठा योजना राज्य शासनाच्या जीवन प्राधिकरण व महापालिका प्रशासनाकडून करून घेण्याऐवजी खाजगी कंपन्यांच्या घशात ही योजना घालण्याचे उद्योग खासदारांनी चालविले आहेत. आयुक्तापासून ते थेट सर्वौच्च न्यायालयाने व इतर सर्व जबाबदार यत्रणांनी ही योजना खाजगी कंपनीला देऊ नये असे सांगितलेले असतानाही खासदार ऐकत नाहीत. नारेगावच्या नागरिकांनी कचरा टाकण्यास विरोध केल्यानंतर मिटमिटा आणि पडेगावात कचरा टाकण्यासाठी आलेल्या गाड्यांची स्थानिकांनी तोडफोड करत पेटवून दिल्या. यावेळी आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज आणि अश्रूधूराच्या कांड्या फोडल्या. परिणामी संतप्त झालेल्या स्थानिकांनी पोलिसांवर तुफान दगडफेक केली. या प्रकरणाचे पडसाद विधीमंडळात देखील उमटताना पहायला मिळाले.

शुक्रवार सोळा मार्चला कचरा कोंडीस एक महीना पूर्ण होत आहे. शहरात विविध ठिकाणी काही दिवसांपासून सुमारे तीन हजार मेट्रिक टन कचरा साचला असून हा कचरा येत्या दोन दिवसांत उचलण्यात येईल. व कचऱ्याचे ओला-सुका वर्गीकरण करून ज्या त्या वॉर्डाचा कचरा तिथेच जिरवून कंपोस्टिंग करण्यावर भर दिला जाणार असल्याची माहिती विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांनी दिली. प्रत्येक अधिकारी, कर्मचाऱ्यांनी कचरा वर्गीकरणास आपल्या पासून सुरवात करत घरातील कचऱ्याचे ओला व सुका असे वर्गीकरण करूनच मनपाच्या सफाई कर्मचाऱ्याकडे द्यावा. जेणेकरून ओल्या कचऱ्यावर योग्य प्रक्रिया करून पुनर्वापर करता येईल. प्रत्येक वार्डासाठी एक एकर जागा लागणार असून या जागेचा वापर कचरा डम्पिंग नव्हे तर कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी केला जाणार आहे.

कसे राबविले जाणार आहे हे अभियान

संपूर्ण शहराची स्वच्छता या अभिनयाच्या माध्यमातून करण्यात येणार आहे .गोळा केलेल्या कचऱ्याचे वर्गीकरण महापालिका करणार आसून हा कचरा टाकण्यासाठी पर्यायी व्यवस्था म्हणून शहरतील नऊ झोन मधील 18 ठिकाणाची निवड करण्यात आली आहे .

या अभियानात महाविद्यालयीन विद्यार्थी , नागरिक , व्यापारी , सामजिक संस्था सहभाग घेणार असून त्यांना कचरा टाकण्यासाठी वाहने, गोणी आणि हँडग्लोज , मास्क , उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तसेच सेंद्रियखत प्रक्रियेसंदर्भात मार्गदर्शन केले जाणार आहे.

शहराला कचरामुक्त करण्यासाठी “स्वच्छता हीच सेवा” हे अभियान येत्या शनिवारी सकाळी 7 वाजता राबवण्यात येणार आहे. ‘सुरवात करूया घरापासून घरातल्या प्रत्येका पासून’ हे या अभिनयाचे घोषवाक्य असून नागरिकांनी यात सहभागी व्हावे असे आवाहन विभागीय आयुक्त डॉ पुरुषोत्तम भापकर यांनी केले.

1 Comment

Click here to post a comment