fbpx

स्वच्छता अॅपला ठाणेकरांचा ठेंगा

swachhata-moud-

ठाणे : स्वच्छ भारत अभियानासाठी सुरु करण्यात आलेले अॅप फक्त ८ हजार ठाणेकरांनी डाऊनलोड केले आहे. ठाणेकरांकडून अॅपला अत्यल्प प्रतिसाद मिळाला आहे. लोकसंख्येच्या निकषानुसार केंद्र सरकारने जे धोरण ठरविले आहे.स्वच्छ भारत अभियानाच्या माध्यमातून शहरातील एकूण लोकसंख्येच्या तुलनेत ०.१० टक्के नागरिकांनी स्वच्छता अॅप डाऊनलोड करणे आवश्यक आहे. यावर देशात त्या शहराचा क्रमांक ठरवला जाणार आहे. २०११च्या जनगणेनुसार ठाणे शहराची लोकसंख्या १८ लाख ४१ हजार इतकी होती. त्यानुसार ठाणे शहरातून ४५ हजारांपेक्षा जास्त नागरिकांनी हा स्वच्छता अॅप डाउनलोड करणे आवश्यक होते. मात्र याकरिता पालिकेने कोणतेही प्रयत्न केले नसल्याचे सांगण्यात येत आहे. केंद्र सरकारने गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात हे अॅप सुरू केले होते.