परिसराची स्वच्छता हाच बर्ड फ्ल्यू टाळण्याचा मंत्र

bird

औरंगाबाद; मनपाकडून वॉर्ड अधिकाऱ्यांना प्रशिक्षण : परभणी जिल्ह्यात बर्ड फ्ल्यू घोषित करण्यात आला असून औरंगाबाद जिल्हा रेड अलर्टवर आहे. या पार्श्वभूमीवर औरंगाबाद महानगरपालिका येथे प्रबोधनकार केशव सिताराम ठाकरे सभागृहात महापालिकेतील सर्व वॉर्ड अधिकारी आणि वॉर्ड अभियंता, तसेच पशुसंवर्धन विभागाचे अधिकारी-कर्मचारी यांना बर्ड फ्ल्यू पूर्व तयारी आणि जर तशी परिस्थिती उद्भवली तर घ्यावयाची काळजी आणि उपाययोजनांबाबत प्रशिक्षण देण्यात आले.

वॉर्ड स्तरावर वॉर्ड अधिकारी आणि वॉर्ड अभियंता यांच्यावर मुख्य जबाबदारी आहे.त्यांनी पथक निर्माण करावे.यात स्वछता निरीक्षक आणि वैद्यकीय अधिकारी यांचा समावेश राहील.मनपा हद्दीत जलाशय जसे की हर्सूल तलाव, सलीम अली सरोवर आणि इतर ठिकाणी जिथे स्थानिक आणि प्रवासी पक्षी जास्त संख्येत येतात किंवा राहतात अशा ठिकाणी विशेष लक्ष ठेवावे.तसेच वॉर्डनिहाय अधिकृत कुक्कुट व मांस विक्रेत्यांची यादी मनपा पशुसंवर्धन विभागाकडून घ्यावी. बर्ड फ्ल्यू बाबत प्रभोधन करावे अशा सूचना यावेळी करण्यात आल्या आहेत.

यावेळी दडके यांनी पॉवर पॉईंट प्रेझेंटेशनच्या साहाय्याने नमुने गोळा करणे, मृत पक्षीयांची विल्हेवाट लावणे, स्वतः घेण्याची काळजी आणि यंत्रणा कशी सज्ज ठेवावी याबाबत मार्गदर्शन केले.जिथे कमी किंवा जास्त संख्येत पक्षी मृत पावले तर निरोप मिळताच अशा ठिकाणी तात्काळ पोहोचावे आणि याची माहिती संबंधितांना देण्यात यावी. स्वतःची आणि परिसराची स्वच्छता हाच बर्ड फ्ल्यू टाळण्याचा मंत्र असल्याचे ते म्हणाले.

महत्वाच्या बातम्या