fbpx

सहकारमंत्री सुभाष देशमुखांच्या लोकमंगलला क्लीन चिट

subhash deshmukh

टीम महाराष्ट्र देशा : सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या लोकमंगल मल्टिस्टेट को ऑपरेटिव्ह सोसायटीला गैरव्यवहारप्रकरणी राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी क्लीन चीट दिली आहे. विशेष म्हणजे लोकमंगल सोसायटीबाबत एफआयआर दाखल असून चौकशी सुरु असतानाच राज्यमंत्र्यांनी क्लीन चिट दिली आहे.

राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी लोकमंगल सोसायटीने कोणताही गैरव्यवहार केला नाही,उलट सरकारकडून घेतलेलं अनुदान परत देण्याचा ठराव पास करुन त्यांनी व्याजासकट पैसे परत केले असल्याचं उत्तर विधान परिषदेत दिलं. त्याबरोबरच लोकमंगल प्रकरणी पोलीस तपास सुरु आहे. तसेच लोकमंगलचा सल्लागार (consultant) फरार असून तो सापडत नसल्याची माहिती राज्यमंत्र्यांनी दिली.

दरम्यान, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी या प्रकरणी आक्षेप घेतला आहे. चोर चोरी करत असताना अलार्म वाजला पण त्याचा चोरीचा हेतू होता असं म्हणतं या प्रकरणी न्यायालयीन चौकशीची मागणी धनंजय मुंडे यांनी केली आहे.