मुख्यमंत्र्यांकडून अजून एका भाजप च्या बड्या नेत्याला अभय

Devendra-Fadnavis

मुंबई : गेल्या अनेक दिवसांपासून भारतीय जनता पक्षाचा प्रदेशाध्यक्ष बदलाच्या चर्चेला उधान आले होते. दानावेंच्या वादग्रस्त वक्त्यव्यामुळे त्यांची उचलबांगडी निश्चीत मानली जात होती . पण आज बोरिवली येथे भाजप कार्यकारणीच्या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रावसाहेब दानवे यांना अभय दिले आहेत . तसच स्वतः मुख्यमंत्र्यांच्या दिल्ली बदलीवर सुधा त्यांनी स्पष्टीकरण दिले.
“रावसाहेब दानवे यांच्या नेतृत्वात आम्ही सगळ्या निवडणुका जिंकल्या त्यामुळे रावसाहेब दानवे हे कुठेही जाणार नाहीत . पत्रकारांना बातम्या कमी पडल्या म्हणून पत्रकार कधी मला दिल्ली ला पाठवतात तर कधी दानवेना मुंबई ला पाठवतात पण कार्यकर्त्यांनी संभ्रमात राहू नये कारण ना मी कुठ जाणार ना रावसाहेब दानवे कुठ जाणार”. अस वक्तव्य करून मुख्यमंत्र्यांनी भाजप च्या प्रदेशाध्यक्ष बदलाच्या चर्चेला आज पूर्णविराम देत रावसाहेब दानवे यांना अभय दिल आहे.