शिवसेनेतील वाद चव्हाट्यावर, शहरप्रमुखांनीचं नगरसेवकाच्या कार्यालयाची केली तोडफोड

टीम महाराष्ट्र देशा : विधानसभा निवडणुका आता तोंडावर आल्या आहेत. त्यामुळे प्रत्येक राजकीय पक्षाची निवडणुकीसाठीची जोरदार तयारी सुरु आहे.अशातच शिवसेना पक्षातील वाद चव्हाट्यावर येत आहेत. तर एकाच पक्षात असून देखील कार्यकर्ते आणि नेते यांच्यात मतभेद आणि वाद असल्याच दिसत आहे. बदलापूरमध्ये या वादाचे आणि मतभेदांचे प्रमाण सर्वाधिक असल्याच दिसत आहे. कारण शिवसैनिकांनीच नगरसेवकाच्या कार्यालयाची तोडफोड केल्याची घटना घडली आहे.

शिवसेनेचे नगरसेवक शैलेश वडनेरे आणि शहरप्रमुख वामन म्हात्रे यांच्यातील वाद आता शिगेला पोहचला आहे. कारण पालिकेच्या सर्वसाधारण सभेआधी वामन म्हात्रे आणि नगरसेवक शैलेश वडनेरे यांच्यात वादावादी झाली होती. त्या वादाचे पडसाद सभा संपल्यानंतर उमटले आहेत. काही शिवसैनिकांनी वडनेरे यांच्या कार्यालयावर जाऊन त्यांच्या कार्यालयाची तोडफोड केली आहे. या प्रकरणानंतर शिवसेनेतील नगरसेवक आणि शहर प्रमुख यांच्यातील संघर्ष पुन्हा एकदा समोर आला आहे.

दरम्यान गेल्या वर्षभरापासून म्हात्रे आणि वडनेरे यांच्यात राजकीय वाद निर्माण झाला होता. त्यातच वडनेरे हे गेल्या सहा महिन्यांपासून विधानसभा निवडणुकीच्या दृस्ठीने मतदारसंघात सक्रीय झाले आहेत. त्यामुळे वादाला अजून एक निमित मिळाल होत. या वादातूनच हा हल्ला झाला आहे. या प्रकारानंतर शैलेश वडनेरे यांनी शिवसैनिकांच्या विरोधात बदलापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.