येरवडा कारागृहात टोळीयुद्धाचा भडका उडाल्याने तणावाचं वातावरण

पुणे : येरवडा कारागृहात दोन दिवसांत हाणामारीच्या तीन घटना घडल्यात. या घटनांमध्ये दोन कैदी गंभीर जखमी झाले असून एक तुरुंग अधिकारी जखमी झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. हाणामारीच्या घटनेने येरवडा कारागृहात कैदी आणि कर्मचाऱ्यांमध्ये देखील तणावाचं वातावरण आहे.दरम्यान, तीघाही जखमींवर ससुन रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

मंगळवारी सकाळी सात वाजता तुषार हंबीर या कैद्यावर शाहरुख शेख, अमन अन्सारी आणि या तीघांनी खीळा आणि दगड विटांनी हल्ला केला. गळ्यावर खीळ्याचा वार झाल्याने तुषार हंबीर यामधे गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर ससुन रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Loading...

त्यानंतर काही वेळातच म्हणजे सकाळी दहा वाजता तुषार हंबीरच्या समर्थकांनी शाहरुख शेखचा मित्र शाहरुख अस्लम खान याला मारहाण करण्यास सुरुवात केली. ही मारामारी सोडवण्यासाठी गेलेल्या तुरुंग अधिकारी संदीप एकशिंगे यांनाही तुषार हंबीरच्या समर्थकांनी बेदम मारहाण केली. संदीप एकशिंगे यांच्यावरही रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

त्यानंतर बुधवारी सकाळी मोहम्मद जबाल नदाफ या कैद्यावर तुषार हंबीरच्या समर्थकांनी हल्ला चढवला आणि त्याच्या डोक्यात दगड घातला. यामध्ये मोहम्मद नदाफ हा गंभीर जखमी झाला असून ससुन रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या हाणामारीत सहभागी असलेले सगळे आरोपी वेगवेगळ्या हत्या प्रकरणातील आरोपी असुन सराईत गुन्हेगार आहेत.

दरम्यान,येरवडा पोलिसांनी या १४ जणांविरुद्ध दंगल माजविणे, सरकारी कामात अडथळा आणणे, मारहाण करणे अशा विविध कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे.

काय आहे या हल्लेखोरांची पार्श्वभूमी ?

तुषार हंबीर

तुषार हंबीर हा २०१४ ला हडपसरमध्ये झालेल्या दंगलीमधे मारल्या गेलेल्या मोहसीन शेख हत्या प्रकरणातील आरोपी आहे.त्याचबरोबर तुषार हंबीरवर लोणी काळभोर पोलिस स्टेशनमध्ये एक आणि पौड पोलिस स्टेशनमध्ये एक असे खुनाचे आणखी दोन गुन्हे दाखल आहेत. भोसरी आणि हडपसर पोलिस स्टेशनमध्ये त्याच्यावर चोरी, दरोडा आणि मारामारीचे गुन्हे नोंद आहेत. २०१६ मधे त्याच्यावर मोक्का कायद्याअंतर्गत कारवाई करण्यात आली होती.तुषार हंबीर हा हिंदू राष्ट्र सेनेचा संघटक म्हणून देखील काम करत होता.

शाहरुख शेख,अमन अन्सारी,सलीम शेख

शाहरुख शेख याच्यावर हिंजवडी पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा नोंद आहे. तर अमन अन्सारी आणि सलीम शेख यांच्यावर लोणावळा पोलिस स्टेशनमध्ये खुन आणि दरोड्याचा गुन्हा दाखल आहे.

मोहम्मद नदाफ

बुधवारी ज्याच्यावर हल्ला करण्यात आला तो मोहम्मद नदाफ हा सांगली जिल्ह्यातील सराईत गुन्हेगार असुन त्याच्यावर तीन खुनांसह एकुण बावीस गुन्हे नोंद आहेत.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

इतिहासावरून देवेंद्र फडणवीस-आदित्य ठाकरेंमध्ये जुंपली
'झारखंड निवडणुकीवेळी धोनीनं भाजपात प्रवेश न केल्याने BCCIने करारातून वगळले'
सुप्रिया सुळे यांनीही पहिला 'तान्हाजी', चित्रपट पाहून म्हणाल्या...
पाच वर्ष सरकार चालवायचं आहे लक्षात ठेवा;शरद पवारांचा संजय राऊतांना सूचक इशारा
मलाही बेळगाव पोलिसांनी मारहण केली होती : शरद पवार
सचिन सावंत संभाजी भिडेंवर बरसले, म्हणतात...
राष्ट्रवादीतून भाजपमध्ये आलेला 'हा' युवा आमदार बनला ठाणे शहर जिल्हा भाजप अध्यक्ष
'माझे पप्पा' हा निबंध लिहून सर्वांच्या डोळ्याला पाणी आणणाऱ्या 'त्या' मुलाची धनंजय मुंडेंनी घेतली दखल
वंशज असल्याचे पुरावे मागणे चुकीचेचं नाही तर मूर्खपणाचे
‘सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी विरोधी पक्षातील भूमिकेतून बाहेर यावं’