Share

Pankaja Munde | पंकजा मुंडेंच्या मेळाव्यात भाषणानंतर कार्यकर्त्यांमध्ये राडा ; पोलिसांचा लाठीचार्ज

बीड : भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या मेळाव्यात भाषणानंतर गोंधळ झाला. कार्यकर्ते भिडल्याची चर्चा आहे. पंकजा मुंडे यांनी स्टेजवरून कार्यकर्त्यांना संबोधित केले. त्यानंतर त्यांच्या मेळाव्यात गोंधळ झाला. मोठ्या प्रमाणात पंकजा मुंडे यांचे कार्यकर्ते एकवटले होते. बीडमधील सावरगाव येथे दसरा मेळाव्यात पंकजा मुंडे यांचे भाषण झाले.

गोंधळादरम्यान कार्यकर्त्यांना शांत राहण्याच्या सूचना देण्यात आल्या. दरम्यान गर्दी पांगवण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज केला.  मंचावरुन शांततेचे आवाहन करण्यात आले. लाठीचार्ज केल्यानंतर गर्दी पांगवण्यात पोलिसांना यश आले. नेमका हा गोंधळ का झाला, गोंधळ करणारे कार्यकर्ते कोण होते, याची माहिती अद्याप मिळू शकली नाही.

पंकजा मुंडे काय म्हणाल्या?

माझा मेळावा हा गरिबांचा, वंचिताचा असून गावाकडचा साधारण मेळावा आहे, इथे ना खुर्च्या लागल्या आहेत, ना खाण्या पिण्याची व्यवस्था आहे, लोक आपल्या घरातूनच भाकरी बांधून आणतात, माझ्यासाठी ही वेगळी ताकद आहे, मला मोठा आशीर्वाद आहे, असं पंकजा मुंडे यांनी म्हटलं आहे.

पंकजा यांनी आपल्या मनातील सर्वसामान्य लोकांची भावना व्यक्त करताना मुंबई मेळाव्यातील शान शौकतीवर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला. आमचा मेळावा डोंगरांमध्ये होतो, डोक्यावर ऊन असतं तरीही लोकांचा उल्हास असतो, असा माझा मेळावा असतो, माझा मेळावा हा पक्षाचा नसून वंचितांचा असतो, असं पंकजा मुंडे यांनी म्हटलं आहे.

एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे या दोन्हीपैकी कोणत्या दसऱ्या मेळाव्यातील भाषण ऐकण्याची उत्सुकता आहे?, असा सवाल पंकजा मुंडे यांना विचारण्यात आला होता. त्यावर त्या म्हणाल्या की,मुंबईत आज दोन मेळावे होणार आहेत. हे मेळावे प्रचंड ताकदीने होत आहेत. सर्वांचे लक्ष या मेळाव्याकडे आहे. सर्व माध्यमांचं लक्ष या मेळाव्याकडे आहे. म्हणून मी दोघांनाही शुभेच्छा देते. आज पंकजा मुंडे यांचा भागवान गडावर दसरा मेळावा आयोजित केला होता. त्यावेळी त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला.

महत्वाच्या बातम्या :

बीड : भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या मेळाव्यात भाषणानंतर गोंधळ झाला. कार्यकर्ते भिडल्याची चर्चा आहे. पंकजा मुंडे यांनी स्टेजवरून कार्यकर्त्यांना संबोधित केले. …

पुढे वाचा

Maharashtra Marathi News Politics

Join WhatsApp

Join Now