‘टाळी एका हाताने वाजत नाही; बंगालमध्ये हिंसेला कोण चिथावणी देतंय याचा शोध घ्या’

sanjay raut

मुंबई : विधानसभा-लोकसभा पोटनिवडणुकांसह ५ राज्यातील विधानसभा निवडणुकांचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. देशाचं लक्ष्य असलेल्या पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसने पुन्हा एकदा एकहाती बहुमत मिळवलं असून भाजपला पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासारखे नेते प्रचाराच्या रणधुमाळीत उतरवून देखील दोन अंकी जागांवरच समाधान मानावं लागलं आहे.

मात्र आता निवडणुकीनंतर पश्चिम बंगालमध्ये पुन्हा एकदा हिंसाचार उफळल्याचं दिसून येत आहे. कालपासून सुरु झालेल्या या हिंसाचारामध्ये कालपासून ११ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती सध्या मिळत आहे. हा हिंसाचार तृणमूल कॉंग्रेसने घडवून आणली असल्याचा आरोप भाजपकडून करण्यात आलेला आहे. तर याच पार्श्वभूमीवर भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा आज बंगालमध्ये जाणार आहेत.

या सर्व पार्श्वभूमीवर आज शिवसेना नेते व राज्यसभा खासदार संजय राऊत बोलत होते यावेळी ते म्हणाले कि, ‘ निवडणूक निकाला नंतर बंगालमध्ये हिंसा उसळली आहे. ही अत्यंत दुर्देवी आणि चिंताजनक बाब आहे, असं सांगतानाच हिंसा घडवणारे बंगालचे आहेत की बंगालाबाहेरचे हे पाहावे लागेल. टाळी एका हाताने वाजत नाही. हिंसेला कोण चिथावणी देतंय त्याचा शोध घ्याव लागेल असे मत त्यांनी मांडले आहे.

या निकालानंतर बंगालमध्ये उसळलेली हिंसा चिंताजनक आहे. दोन्ही बाजूने शांतता राखली पाहिजे. केंद्राने आणि बंगालच्या सरकराने संयमाने राहावे लागेल. बंगालचा इतिहास रक्तरंजित आहे. हे खरे आहे. पण सर्वांनी देशाची परिस्थिती पाहावी. कोरोनाची परिस्थिती ओळखून काम करावं. एकमेकांना धमक्या देणं थांबवावं, असं सांगतानाच हिंसा घडवणारे बंगालचे की बाहेरचे हे पाहावे लागेल. टाळी एका हाताने वाजत नाही. हिंसेला कोण चिथावणी देतोय याचा शोध घ्या, या हिंसेचा तपास झालाच पाहिजे, असा वक्तव्य राऊत यांनीकेले आहे.

दरम्यान, पश्चिम बंगालची निवडणूक तृणमूल काँग्रेस आणि भाजपसाठी प्रतिष्ठेची झाली होती. अटीतटीचा सामना होण्याचा अंदाज खोटा ठरवत तृणमूलने भाजपला रोखून तिसऱ्यांदा सत्ता मिळवली. निवडणुकीनंतर पश्चिम बंगालमध्ये पुन्हा एकदा हिंसाचार उफळल्याचे दिसून येत आहे. या पार्श्वभूमीवर पश्चिम बंगाल भाजप प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष यांनी राज्यपालांना निवदेनही सादर केले. पश्चिम बंगालमधील भटपारा येथील घोषपारा रोडवरील भाजप कार्यालय आणि काही दुकानांमध्ये अज्ञातांनी तोडफोड केली. परिसरात बॉम्बही फेकण्यात आले, अशी माहिती मिळाली आहे.

महत्त्वाच्या बातम्या