मुंबई : मान्सून सुरु होताच लोकांना अनेक नैसर्गिक अपत्यांना सामोरे जावे लागते. महापूर येणे, वादळ, वीज कोसळणे अशा प्रकारच्या नैसर्गिक आपत्ती मान्सूनमध्ये येतच असतात. यामध्ये वीज पडून अनेक लोक मृत्यूमुखी पडल्याची घटना समोर येत असतात. या घटनांपासून आपली सुटका होणार आहे. आता वीज पडायच्या १५ मिनिट अगोदरच तुम्हाला अलर्ट मिळणार आहे. ही सुविधा मोबाईलमध्ये दामिनी अँपवर उबलब्ध असणार आहे.
तज्ञांच्या मते देशामध्ये दरवर्षी २०० पेक्षा जास्त लोकांचा वीज पडून मृत्यू होतो. हा होणारा मृत्यू रोखण्यासाठीच इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स, पुणे यांनी या अँपची निर्मिती केली आहे. या अँपमुळे आपल्याला विजेचा कडकडात होण्याच्या ५ ते १५ मिनिटे आधीच इशारा मिळेल. दामिनी अँप आपण गुगल प्लेस्टोरवरून डाउनलोड करू शकतो. ऍपवर नाव, मोबाईल नंबर, पिन कोड, लोकेशन, व्यवसाया या सर्व गोष्टींची नोंदणी करावी. यामुळे वीज कोसळण्याचा अलर्ट लवकर मिळेल.
जाणून घ्या या अँपचे फायदे –
- हे अँप विजांचा वेग आणि गडगडाटाच्या मार्गाची अचूक माहिती देईल.
- शेतकरी, नोकरदार, वाहतूक करणारे आणि प्रवाशांसाठी हे अँप जीवनरक्षक ठरेल जे वेळेवर विजेचा इशारा देऊन जीवन आणि मालमत्ता वाचवू शकतात.
- वीज कोसळून होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण कमी होईल.
महत्वाच्या बातम्या :
>>> आमच्या सोशल मीडिया फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील व्हा! फेसबुक & टेलिग्राम ग्रुप <<<
>>> आपल्या परिसरातील महत्त्वाच्या समस्यांना वाचा फोडून, तुमच्या बातमीने बदल घडवा. { बातमी पाठवा SUBMIT NEWS } <<<