नागरिक नाकारत आहेत चिनी वस्तू

चिनी फटाके बाजारातून आउट

लातूर:जिल्ह्यातील ग्रामीण भागातही नागरिकांनी चिनी वस्तू नाकारणे सुरु केले आहे. चिनी आकाश कंदील, पणत्या आणि इतर चिनी वस्तू नागरिक घेत नाहीत, दुकानदारही ठेवत नाहीत. त्या ऐवजी सगळीकडे हस्तनिर्मित आकाश कंदील आणि पणत्यांची विक्री दिसून आली. या शिवाय चिनी फटाकेही बाजारातून आउट झाले आहेत.

उत्तम दर्जाच्या देशी आकाश कंदिलांची किंमत 50 ते 1400 रुपयांपर्यंत आहे. तर स्थानीक बनावटीचे कंदील 60 पासून 400 रुपयांपर्यंत मिळतात. बाजारात स्थानिक बनावटीच्या 20 ते 25 प्रकारच्या पणत्या मिळतात. 15 रुपयांपासून 100 रुपये डझनाने पणत्या मिळत असून गरीबांघरची दिवाळीहि साजरी व्हावी म्हणून लोक मुददाम रस्त्यावर बसलेल्या विक्रेत्यांकडून पणत्या घेत आहेत.

You might also like
Comments
Loading...