लातूर :– जिल्हयात नाविन्यपूर्ण सीएनजी गॅस संकलन केंद्राचे आगमण झाले असून काही महिन्यातच लातूरकरांना घरगुती वापरासाठी गॅस उपलब्ध होणार असल्याचे प्रतिपादन, राज्याचे वैद्यकीय शिक्षण,सांस्कृतिक कार्यमंत्री तथा पालकमंत्री अमित देशमुख यांनी केले.औसा तालुक्यातील राष्ट्रीय महामार्गावरील आशिव गावाजवळील सीएनजी अशोका गॅस संकलन केंद्राच्या उद्वघाटन प्रसंगी ते बोलत होते.
या कार्यक्रमास सीएनजी गॅस चे अमितकुमार सॅम,लातूर महानगर पालिकेचे महापौर विक्रांम गोजमगुंडे,विकासरत्न विलासराव देशमुख मांजरा सहाकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष शैलेश उडगे,ॲड.किरण जाधव,बाबासाहेब गायकवाड उपस्थित होते.
यावेळी पालकमंत्री अमित देशमुख म्हणाले की,जिल्हयात एका नाविन्यपूर्ण प्रकल्पाचे उद्घाटन होत आहे.या सीएनजी गॅस प्रकल्पामुळे काही महिन्यातच लातूरकरांना घरगुती वापरासाठी गॅस मिळणार असून लातूर येथील जुन्या व नवीन औद्योगीक वसाहतींतील उद्योगाना गॅस पुरवठा केला जाणार आहे.यासाठी महानगर पालिकेने सीएनजी गॅस मास्टर प्लॉन तयार करावा अशा संबंधितांना सूचना दिल्या.
प्रारंभी सीएनजी गॅस केंद्राच्या परिसरात पालकमंत्री देशमुख यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी सीएनजी अशोका गॅसचे अमितकुमार सॅम ,महानगरपालिकेचे महापौर विक्रांत गौजमगुंडे यांची समयोचित भाषणे झाली. कार्यक्रमाचे संचालन सीएनजी गॅसचे शैलेश नखाते यांनी केले.
महत्वाच्या बातम्या
- सोलापूर :अनावश्यक खर्च टाळून जनतेशी निगडित विषयाला महत्व द्या; एकनाथ शिंदे यांचे निर्देश
- लसीकरणाची सुरुवात कोरोनाच्या लढाईतील महत्वपूर्ण आणि दिलासादायक पाऊल- सुभाष देसाई
- ‘प्रतिबंधित क्षेत्रात कुक्कुट पक्षांची खरेदी-विक्री, वाहतूक, बाजार व जत्रा आयोजित करण्यास प्रतिबंध’
- देशाचं भविष्य, राष्ट्राची संपत्ती शिक्षण विभाग घडवितो – वर्षा गायकवाड
- औरंगाबादमधील कचऱ्याचा प्रलंबित प्रश्न सहा महिन्यात सोडवण्यासाठी प्रयत्न करू- आदित्य ठाकरे