कोरोनाबाबत नागरिक बेफिकीर आहेत असं म्हणणाऱ्या पवारांनी ‘संवाद यात्रे’बाबत चकार शब्दही काढला नाही

sharad pawar

मुंबई – राज्यावर पुन्हा एकदा कोरोनाचे संकट घोंगावू लागले आहे. गेल्या काही दिवसांत राज्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे.कोरोनाची आकडेवारी वाढल्याने सरकारने खबरदारीची पावले उचलली आहेत. विविध राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रमांवर बंदी घालण्यात आली आहे. तसेच आठ दिवस परिस्थितीवर लक्ष ठेवून लॉकडाऊनचा निर्णय घेतला जाणार आहे.

दरम्यान, अनेक देशांमध्ये पुन्हा लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. आता आतापर्यंत कोरोनाची रुग्णसंख्या कमी होत असताना देशातील अनेक राज्यांमध्ये कोरोना पुन्हा हात-पाय पसरेल अशी भीती व्यक्त केली जात आहे. त्यात महाराष्ट्रातील कोरोनाची रुग्णसंख्या वाढत असल्याने आपल्याकडेही पुन्हा लॉकडाऊन लागू करणार का? याबाबत शक्यता व्यक्त केली जात आहे.

दरम्यान,रायगडमधील रोहा येथील कार्यक्रमात बोलताना शरद पवारांनी राज्यात कोरोना प्रचंड वेगाने फोफावतोय, असं म्हटलं होते. दररोज कोरोनाबाधितांचा आकडा वाढतोय. मात्र, तरीदेखील नागरिकांमध्ये गांभीर्य नसल्याने शरद पवार यांनी नाराजी आणि संताप व्यक्त केला होता.
राज्यातील नागरिक कोरोनाबाबत बेफिकीर आहेत. प्रत्येकाने खबरदारी घेण्याची जास्त आवश्यकता आहे. कोरोना विषाणू घातक आहे, त्यामुळे काळजी घ्या, असं आवाहन शरद पवार यांनी केलं आहे.

“मी आता येताना आदिती आणि तटकरे साहेबांना दाखवतो होतो, रस्त्याने दहा माणसं दिसली त्यापैकी सात माणसांच्या तोंडावर मास्क नव्हतं. सगळे लोकं मला हात दाखवत होते. नमस्कार करत होते. मी म्हटलं मास्कचं काय? तर त्यावर कुणी बोलत नव्हतं”, असं शरद पवार म्हणाले

दरम्यान, एका बाजूला पवार एका बाजूला राज्यातील नागरिक कोरोनाबाबत बेफिकीर आहेत असं म्हणत आहेत मात्र त्यांच्याच पक्षाचे नेते हे जनतेची खरंच फिकीर करतात का असा सवाल देखील उपस्थित होत आहे.राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व मंत्री जयंत पाटील यांच्या नेतृत्वात काही दिवसांपूर्वीच राज्यभरात परिवार संवाद यात्रा काढण्यात आली होती.या संवाद यात्रेला अभूतपूर्व असा प्रतिसाद मिळाला असून पदाधिकारी,कार्यकर्ते यांच्यासह सर्वसामान्य नागरिकांची देखील मोठ्याप्रमाणावर गर्दी पाहायला मिळाली आहे.

यावेळी मोठ्या प्रमाणात गावोगावी कार्यकर्त्यांचे मेळावे देखील घेण्यात आले यावेळी कोरोनाच्या नियमांचे उल्लंघन होताना दिसून आले. मास्कचा वापर नेते मंडळीच करताना दिसून येत नसल्याने इतर कुणाकडून नियमांचं पालन व्हावं हि अपेक्षा पवारांनी ठेवणे चुकीचे आहे. दुसऱ्यांना उपदेश देताना किंवा टीका करताना राजकीय नेत्यांनी त्यांच्या पक्षाचे नेते याबाबत गंभीर आहेत का याची माहिती आधी घेणे आवश्यक आहे.

नागरिक बेफिकीर आहेत असे म्हणणाऱ्या पवारांनी धुमधडाक्यात पार पडलेल्या संवाद यात्रेबाबत चकार शब्द देखील काढला नाही मग सर्वसामान्य लोकांना कोरोनाच्या नियमांचे पालन करा असा आग्रह त्यांनी धरणे हे कितपत योग्य आहे असा सवाल या निमित्ताने आता सर्वसमान्य विचारत आहेत.

दरम्यान,राजकीय पक्षांना वेगळा न्याय व सामान्य जनतेला वेगळा न्याय असा पायंडा सद्या पडत आहेत. मग सत्तेतील पक्षांचे कार्यक्रम असो व विरोधी पक्षांचे कार्यक्रम.खरचं कोरोनाची भीती असेल तर कडक नियमावली सर्व कार्यक्रम, आंदोलने, सभा यांना सारखीच असावी अशी मागणी जनसामान्यांतून होत आहे.

महत्वाच्या बातम्या