डॉ.पतंगराव कदम यांचे अखेरचे दर्शन घेण्यासाठी उसळला नागरिकांचा जनसागर

डॉ.कदम यांचे पार्थिव हेलिकॉप्टरने सांगलीला नेणार

मुंबई: डॉ पतंगराव कदम यांचे अखेरचे दर्शन घेण्यासाठी नागरिकांचा जनसागर उसळला. तसेच अंत्यदर्शनासाठी राजकीय,सामाजिक,शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. डॉ.कदम यांचे पार्थिव हेलिकॉप्टरने सांगली जिल्ह्यातील ‘सोनहिरा सहकारी साखर कारखाना’ मोहनराव कदम नगर वांगी येथे नेण्यात येणार आहे.

dr.kadam

काँग्रेस पक्षाचे जेष्ठ नेते डॉ. पतंगराव कदम यांचे दुःखद निधन झाले आहे. मुंबईतील लीलावती रुग्णालयात त्यांनी वयाच्या ७३ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर लीलावती रुग्णालयात उपचार केले जात होते. पतंगराव कदम यांनी राज्य मंत्रिमंडळात अनेक मंत्रिपदाची धुरा सक्षमपणे संभाळलेली होती.

महाराष्ट्र विधानसभेवर चार वेळा विजयी झालेल्या डॉ. कदम यांनी राज्य मंत्रिमंडळात वने,मदत भूकंप पुनर्वसन मंत्रीपदांची धुरा संभाळलेली होती. त्यांनी वयाच्या अवघ्या १९ व्या वर्षी भारती विद्यापीठाची स्थापना केली. आज भारतासह जगभरातील अनेक शहरांत भारती विद्यापीठाची महाविद्यालयांचे जाळे पसरले आहे. अत्यंत शांत मितभाषी आणि अभ्यासू म्हणून डॉ. कदम हे ओळखले जायचे. त्यांच्या जाण्याने काँग्रेसचे मोठे नुकसान झाले आहे.