गुरुनानकनगर मधील नागरिक बेवारस कुत्र्यांच्या त्रासामुळे त्रस्त; कारवाई न केल्यास न्यायालयीन लढा देणार

पुणे : पुण्यातील गुरुनानकनगर भागातील नागरिक सध्या भटक्या कुत्र्याच्या त्रासामुळे त्रस्त आहेत. ठिकठिकाणी पडलेले कुत्र्यां-मांजरांची विष्ठा,सडलेले अन्न, हाडांचे तुकडे, रात्री-अपरात्री भुंकण्याच्या आवाजामुळे होणारे ध्वनी प्रदूषण आदिमुळे रहिवाशांचे जगणे कठीण झाले आहे.याविरोधात तेथील रहिवाश्यांनी महापालिका आयुक्तांकडे तक्रार केली आहे. महापालिकेने हा प्रश्न त्वरित न सोडविल्यास आम्ही त्याविरोधात उच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचा इशारा रहिवाशींनी दिला आहे.

मिशन पॉसिबल या संस्थे मार्फत बेवारस प्राण्यांचे पालन केले जाते. प्राण्यांच्या उपचारासाठी या संस्थेने अनधिकृत उपचार केंद्र उभारले आहे. या ठिकाणी अनधिकृतपणे कुत्री पाळण्यात येत आहेत. त्यांचे व्यवस्थितरीत्या संगोपन, व्यवस्थापन, देखभाल, केली जात नाही. नियमाप्रमाणे निवासी डॉक्टरांची सोय न करता स्थानिक तरुणांकडून त्यांच्यावर उपचार केले जातात. उपचारादरम्यान मृत प्राण्यांना गुरुनानकनगर भागातच पुरतात. त्यामुळे वातावरणात दुर्गंधी पसरते. प्राणी प्रेम समजू शकतो, मात्र त्याचा इतरांना नाहक त्रास देणे चुकीचे आहे. असे आरोप पत्रकार परिषदेत तेथील नागरिकांकडून करण्यात आले.

मिशन पॉसिबल या संस्थेसाठी एका दानशूराने स्वतःची अडीज एकर जागा प्रति महिना १ रु. शुल्काने सासवडरोडला उपलब्ध करून दिली आहे. परंतु संबधित संस्था त्या ठिकाणी जाण्याचे टाळत आहे. त्यांना लवकरात लवकर त्या ठिकाणी हलवण्यात यावे अशी मागणी या पत्रकार परिषदेद्वारे करण्यात आली.

माजी कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांना विधानपरिषदेत श्रद्धांजली

पुणे विद्यार्थी गृहास ‘नॅक’ची ‘अ’ श्रेणी

माझी नेमणूक नियमानुसारच; डॉ चंदनवालेंनी फेटाळले तृप्ती देसाईंंचे आरोप