पुण्यात १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांचे लसीकरण होणार नाही; महापौरांची माहिती

murlidhar mohol

पुणे : कोरोनावर मात करण्यासाठी देशातील अधिका-अधिक नागरिकांचे लसीकरण होणे गरजेचे आहे. राज्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता धास्तावलेल्या जनता लसीकरणाला चांगला प्रतिसाद देत आहे. मात्र, एकीकडे कोरोनाचा वाढता धोका तर दुसरीकडे लसींचा तुटवडा यामुळे नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.

लसींचा तुटवडा असल्याने मोजक्याच ठिकाणी लसीकरण केले जात आहे. तर, नोंदणी केल्यानंतरच लसीकरण होत असले तरी साठा उपलब्ध झाला नसल्याचे कारण लसीकरण केंद्रावर दिले जात असल्याने अनेक नागरिकांना विना लसीकरणच माघारी यावं लागत आहे. अशातच, ‘राज्यात १ कोटी ८४ लाख लोकांचं लसीकरण झालं आहे. ४५ वर्षांवरील नागरिकांसाठी ३५ हजार कोवॅक्सिन उपलब्ध आहेत.५ लाख दुसरा डोस द्यायचा आहे. त्यामुळे राज्य सरकारने आज १८ ते ४४ वयोगटातील खरेदी केलेलं कोवॅक्सिन हे आता ४५ पेक्षा जास्त वयाच्या नागरिकांसाठी वापरले जाईल,’ अशी घोषणा राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केली आहे.

त्यामुळे १८ ते ४४ गटातील नागरिकांच्या लसीकरणाला ब्रेक लागला आहे. पुण्यात १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांचे लसीकरण होणार नाही, अशी घोषणा पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी केली आहे. ‘राज्य शासनाच्या निर्देशानुसार पुणे महानगरपालिका हद्दीतही १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांचे लसीकरण स्थगित करण्यात आले असून उद्यापासून आपल्याकडे या वयोगटासाठी लसीकरण होणार नाही. पुणेकर नागरिकांनी नोंद घ्यावी,’ असं ट्विट मुरलीधर मोहोळ यांनी केलं आहे.

महत्वाच्या बातम्या 

IMP