पुणे: उरुळी देवाची आणि फुरसुंगी परिसरात नागरीकांना तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. या परिसरात पुणे महापालिकेच्या वतीने टॅंकर पुरविले जातात परंतु या परिसरातील सर्व नागरिकांना ते पुरेसे नाहीत. याशिवाय टॅंकरद्वारे केल्या जाणाऱ्या पाणीपुरवठ्याचे देखील योग्य नियोजन होत नाही. अशी नागरीकांची तक्रार आहे. परिणामी अनेकदा सर्व नागरीकांना पाणी मिळत नाही. तसेच या परिसरातील पाण्याच्या टाक्या आणि पाईपलाईनचे काम तांत्रिक अडचणींमुळे खोळंबले असून याचा त्रास नागरीकांना सहन करावा लागत आहे. अशी माहिती राष्ट्रवादी खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी ट्वीट करत दिली आहे.
दरम्यान ही परिस्थिती लक्षात घेता पुणे महापालिकेचे आयुक्त विक्रम कुमारजी आपणास नम्र विनंती आहे की, कृपया ही खोळंबलेली कामे मार्गी लावण्याबाबत सकारात्मक विचार करावा.यासोबतच या परिसरात टॅंकरची संख्या वाढवून त्याचे योग्य व्यवस्थापन करण्याबाबत संबंधितांना सूचना द्याव्या. अशी मागणी सुप्रिया सुळे यांनी केली आहे.
उरुळी देवाची आणि फुरसुंगी परिसरात नागरीकांना तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. या परिसरात पुणे महापालिकेच्या वतीने टॅंकर पुरविले जातात परंतु या परिसरातील सर्व नागरिकांना ते पुरेसे नाहीत. याशिवाय टॅंकरद्वारे केल्या जाणाऱ्या पाणीपुरवठ्याचे देखील योग्य नियोजन होत नाही.
— Supriya Sule (@supriya_sule) May 9, 2022
तसेच ऐन उन्हाळ्यात नागरीकांना पाण्यासाठी वणवण करावी लागत असून आपण यामध्ये वैयक्तिक लक्ष घालून यावर उपाययोजना केली तर नागरीकांचा त्रास वाचेल. तरी आपण यावर तातडीने कार्यवाही करण्याबाबत सकारात्मक विचार करावा, ही विनंती. असेही सुप्रिया सुळे यांनी आयुक्त विक्रम कुमार यांना म्हटले आहे.
महत्वाच्या बातम्या:
- ‘तो’ सलमान खान अडचणीत, रील बनवणे पडले महागात; झाली अटक!
- राणा दाम्पत्याच्या अडचणीत वाढ; सत्र न्यायालयाने पाठविली नोटीस!
- IPL 2022 MI vs KKR : मुंबई बदला घेण्यासाठी सज्ज..! वाचा हेड-टू-हेड आकडेवारी का सांगते
- पुतीन ७० व्या वर्षी पुन्हा होणार बाप; गर्लफ्रेंड गरोदर!
- “संजय राऊतांच्या ‘या’ वक्तव्याची अमित शहांकडे तक्रार करणार”- नवनीत राणा