जाणीव असल्यास नागरिक शिस्त पाळतील – सतिश माथूर

satish-mathur

पुणे : पुणे -मुंबई यांसारख्या मोठ्या शहरात वाहतुकीची समस्या मोठ्या प्रमाणात निर्माण होत आहे. ही समस्या सोडविण्यासाठी आम्ही अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यावर भर दिला पाहिजे. तसेच नियमभंग केल्याबद्दल नागरिकांकडून दंड वसुलीचा आकडा वाढण्याऐवजी त्यांच्यामध्ये स्वयंशिस्त वाढावी. आपल्याला कोणीतरी पाहत आहे, याची जाणीव असल्यास नागरिक शिस्त पाळतील, असे मत राज्याचे पोलीस महासंचालक सतिश माथूर यांनी व्यक्त केले.पुणे पोलिसांच्या मध्यवर्ती वाहतूक व्यवस्थापन केंद्राच्या नूतन इमारतीचे उद्घाटन सतिश माथूर यांच्या हस्ते झाले. यावेळी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. यावेळी पुणे पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला, सह पोलीस आयुक्त रवींद्र कदम, रोटरी क्लब ऑफ पुणे बाणेरचे अभय गाडगीळ, फोक्सवॅगनचे डॉ. अँड्रीसन लौरेमन यांच्या वतीने भारतातील सुरक्षा प्रमुख टॉर्स्टन स्टार्क, वाहतूक विभागाचे पोलीस उपायुक्त अशोक मोराळे, तसेच वरिष्ठ अधिकारी व कर्मचारी यावेळी उपस्थित होते. फॉक्सवॅगन इंडिया प्रा.लि. कंपनी व रोटरी क्लब ऑफ पुणे बाणेर यांच्या संयुक्त विद्यामाने मध्यवर्ती वाहतूक व्यवस्थापन केंद्राची नूतन इमारत उभारण्यात आली असून, त्यासाठी 55 लाख रुपये खर्च आला आहे. खिशाला झळ बसल्यावरच नागरिक नियमांचे पालन करतात. यावेळी माथूर यांनी सांगितले. तर, आम्ही एकत्रित येऊन, पुणे शहराला जे शक्य आहे ते देण्याचा प्रयत्न करत असल्याचे यावेळी पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांनी सांगितले.या नूतन वाहतूक व्यवस्थापन केंद्राच्या इमारतीमध्ये सीसीटीव्ही, वायरलेस, कंट्रोल तसेच इ-चलनचे कामकाज चालणार आहे. मार्च 2017 पासून वाहतूक पोलिसांनी इचलनच्या माध्यामातून 3 लाख केसेस केल्या असून, 40 लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे