fbpx

मतं मागायला गेलेल्या उमेदवाराला नागरिकांनी पाजले दुषित पाणी

टीम महाराष्ट्र देशा : निवडणुका लागल्या की प्रत्येक उमेदवार आपल्या मतदार संघातील मतदारांच्या वैयक्तिक भेटी घेत असतो व मतदारांच्या अडचणी जाणून घेत असतो. उत्तर मुंबई मतदारसंघाचे भाजपचे उमेदवार गोपाळ शेट्टी देखील आपल्या मतदार संघातील मतदारांचे उंबरे झिजवत होते त्यावेळी मतदार आपल्या अडचणी सांगत असतानाचंं दुषित पाणी पुरवठा होत असल्याची नागरिकांनी तक्रारी केल्या तर नागरिकांनी गोपाळ शेट्टी यांना दुषित पाणी प्येयला लावले.

गोपाळ शेट्टी प्रचारासाठी मालवणी भागातल्या म्हाडा वसाहतीत गेले असताना स्थानिकांनी त्यांना होणाऱ्या दूषित पाणीपुरवठ्याविषयी तक्रारी केल्या. नुसत्या तक्रारीच नाही, तर त्यांना आपल्या घरी येणारं पाणी प्यायलाही लावलं. गोपाळ शेट्टी यांनीही मतदारांचा प्रश्न मनापासून जाणून घेण्यासाठी निमूटपणे ते पाणी प्यायलं.

दरम्यान म्हाडाच्या या वसाहतीत इतकं अशुद्ध आणि दूषित पाणी येतं की, रहिवासी त्याचा वापर पिण्यासाठी करूच शकत नाहीत. इथले रहिवासी बाटलीबंद पाणी विकत घेऊन आपली तहान भागवत आहेत. त्यामुळे नागरिक आता संतप्त झाले आहेत.यावर गोपाळ शेट्टी म्हणाले की , या भागत पाणीपुरवठा करणारी पाईपलाईन गेल्या 70 वर्षात बदलली नसल्यानं पाणीपुरवठा दूषित होत आहे. मी यावर तातडीने हालचाली करून परिस्थिती बदलण्यासाठी उपाययोजना सुरू केली आहे.