शहरांना दुध आंदोलनाची झळ ; उद्यापासून पुण्यात चितळेही बंद ?

टीम महाराष्ट्र देशा : दूध उत्पादकांना सावरण्यासाठी प्रतिलिटर पाच रुपये सरकारला देणं शक्य आहे. गोवा, कर्नाटक सरकार अशी मदत करतं. त्यामुळे महाराष्ट्र सरकारनेही तशी मदत करावी, दुधाला पाच अनुदान द्याव, दररोज अतिरिक्त ठरणारं चाळीस लाख लिटर गाईच दुध सराकरने सत्तावीस रुपये प्रति लिटर दराने खरेदी करावं या मागण्यासाठी खासदार राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेने पुकारलेल्या दूध आंदोलनाचा आज दुसरा दिवस आहे. पहिल्या दिवशी आंदोलनाचा फारचा परिणाम जाणवला नसला तरी, दुसऱ्या दिवशी दुधाचा काहीसा तुटवडा जाणवू लागला आहे.

पुण्याकडे येणारी दुधाची वाहनं ठिकठिकाणी अडवली जात आहेत. त्यामुळे दूध आंदोलन सुरु राहिलं आणि त्यामुळे दुधाचा पुरवठा झाला नाही तर सर्वसामान्य नागरिकांपासून चहा स्टॉल, डेअर प्रॉडक्ट मालकांना उद्या मोठ्या अडचणींना सामना करावा लागू शकतो.

तर गेल्या दोन दिवसांपासून चितळेंचे दूध संकलन बंद आहे. त्यामुळे पुण्यात उद्यापासून चितळेंचे दूध मिळणार नाही. इतर दुकानांमध्ये आज विक्रीसाठीही दूध उपलब्ध नाही.

मुंबईचं दुध रोखायला मुंबई काय पाकिस्तानात आहे का ? चंद्रकांत पाटलांचा शेतकरी आंदोलनाला विरोध

पीक विम्याची रक्कम किमान पाचशे रुपये : सदाभाऊ खोत