चित्रपटगृह, नाट्यगृह सुरु होणार ? ; ठाकरे सरकारची मंत्रिमंडळ बैठक सुरु

चित्रपटगृह, नाट्यगृह सुरु होणार ? ; ठाकरे सरकारची मंत्रिमंडळ बैठक सुरु

cabinet meeting

मुंबई : राज्यात करोनाच्या पार्श्वभूमीवर घालून दिलेले निर्बंध काही जिल्ह्यांमध्ये काही प्रमाणात शिथिल करण्यात आले. मात्र, काही प्रमाणात आणि काही भागात अजूनही निर्बंध आहेत. त्यामुळे विरोधकांनी सरकारला घेरण्याचा या निमित्ताने पर्यटन सुरु केला आहे. याच पार्श्वभूमीवर आज मुंबईमध्ये महाविकास आघाडीची मंत्रिमंडळ बैठक सुरु झाली आहे.

तसेच कोरोना आणि महापुराच्या पार्श्वभूमीवर राज्य मंत्रिमंडळाची महत्वाची बैठक सुरु झाली आहे. सह्याद्री अतिथीगृहावर ही बैठक होत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह सर्व मंत्री या बैठकीला उपस्थित आहेत. पूरग्रस्तांसाठी मदत आणि कोरोना निर्बंधांबाबत या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. हॉटेल, रेस्टॉरंट्स यांना वेळ वाढवून देणे, चित्रपटगृह, नाट्यगृह सुरु करणे, नियमांसह मॉल्स सुरु करणे, यासह राज्यातील कोरोना निर्बंधात शिथिलता देण्याबाबत या बैठकीत चर्चेची शक्यात व्यक्त केली जात आहे.

त्याचबरोबर 11 जिल्ह्यातील चिंताजनक स्थितीवरही कॅबिनेट बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे. तसेच त बैठकीत पूरग्रस्त भागाचा आढावा, पंचनामे किती झाले, त्यानुसार पॅकेजमध्ये बदलाची शक्यता व्यक्त केली जात आहे. तसंच मराठा आणि ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरही चर्चा होऊ शकते.

महत्त्वाच्या बातम्या