जगनमोहन रेड्डींचा जामीन रद्द करण्याची मागणी करणाऱ्या खासदाराला अटक

jagan mohan reddy

नवी दिल्ली – आंध्र प्रदेशात आज मोठी राजकीय उलथापालथ पाहायला मिळत आहे.आज आंध्र प्रदेशचे खासदार कनुमारी रघुराम कृष्णम राजू यांना सीआयडीने अटक केली आहे. खा.राजू यांच्यावर राज्याच्या प्रतिष्ठेच्या विरोधात काम केल्याचा आरोप आहे. काही दिवसांपूर्वी भ्रष्टाचाराच्या प्रकरणात मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांचा जामीन रद्द करण्याची मागणी खा. राजू यांनी केली होती.

खासदार राजू हे आंध्र प्रदेशातील नरसपुरम लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करतात. ते सत्तारूढ वायएसआर काँग्रेसचे सदस्य असून गेल्या काही दिवसापासून बंडखोरी करत आहेत. त्यांना आंध्र प्रदेश सीआयडीने हैदराबाद येथील त्यांच्या राहत्या घरातून अटक केली.

अधीकाऱ्यांच्या माहितीनुसार, सीआयडीचे अतिरिक्त महासंचालक पी.व्ही. सुनील कुमार यांच्या आदेशानुसार प्राथमिक चौकशी करण्यात आली. राजू आपल्या भाषणांद्वारे नियमितपणे समाजात तणाव निर्माण करणे आणि विविध सरकारी व्यक्तिमत्त्वांवर हल्ला करत होते. जेणेकरुन लोकांचा सरकारवरील विश्वास कमी होईल. ते समुदाय आणि सामाजिक गटांविरूद्ध द्वेषयुक्त भाषण करत असत. तसेच सामाजिक दुर्भावना निर्माण आणि कायदा व सुव्यवस्थेचा भंग करण्यासाठी काही माध्यम वाहिन्यांद्वारे कट रचल्या जात होता, असा आरोप करण्यात आला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

IMP