CID फेम दयाने यवतमाळच्या चिमुकल्यासाठी शेअर केला खास व्हिडीओ

दयानंद शेट्टी

यवतमाळ: गेली कित्येक वर्ष सोनी टीव्ही प्रसिद्ध मालिका CID लोकप्रिय ठरली आहे. या मालिकेतील ACP प्रद्युम्न, इन्स्पेक्टर दया, इन्स्पेक्टर अभिजित ही सर्व पात्र अनेकांच्या पसंतीची आहेत. विशेष म्हणजे यातील दया अर्थात दयानंद शेट्टी हे पात्र लहान मुलांच्या आवडीचे आहे.

या मालिकेतील ‘दया’ दरवाजा तोडो…’ हा संवाद तर प्रचंड फेमस आहे. यवतमाळच्या गार्गी पखाले आणि गायत्री पखाले या दोन चिमुकल्या दयाच्या मोठ्या फॅन आहेत. या चाहत्यासाठी दयाने एक खास व्हिडिओ पाठवला आहे.  या दोघीना अजय देवगण, दयानंद शेट्टी यांना प्रत्यक्ष भेटण्याचे इच्छा या झाली होती. यासाठी गार्गी आणि गायत्री यांना मुंबईत येऊन दया आणि सिंघम यांना भेटायचं होतं. पण ते शक्य नसल्यानं त्यांच्या वडिलांनी यासाठी प्रयत्न केले.

त्यानंतर दयानंद शेट्टी यांच्या सहाय्यकाशी संपर्क करून गार्गी आणि गायत्री या चिमुकल्या फॅन्सची गोष्ट सांगितली. त्यानंतर दयानंद शेट्टी यांनी प्रत्यक्ष भेटणं शक्य नसल्याने त्याने व्हिडियो द्वारे संपर्क करत  त्यांच्यासाठी खास सरप्राइज दिले आहे.

महत्वाच्या बातम्या

IMP