चव्हाणांना खडसेंबद्दल बोलण्याचा नैतिक अधिकार नाही : रावसाहेब दानवे

अशोक चव्हाण यांनी खडसेंना दिली होती काँग्रेस मध्ये येण्याची ऑफर

बई: भाजपचे नेते एकनाथ खडसे यांनी काहीदिवसांपूर्वी रावेरमध्ये एका कार्यक्रमात भाजप विरुद्ध नाराजी व्यक्त केली होती. पक्ष मला बाहेर ढकलतयं, मला पक्ष सोडायची इच्छा नाही. गेली ४० वर्षे मी भाजपसाठी काम करत आहे. पण जर पक्षानेच मला दूर केले, तर माझ्यासमोर पर्याय उरणार नाही, पक्ष सोडायला भाग पाडू नका, राजकारणात काहीही शक्य असते, असे सूचक विधान करत एकनाथ खडसेंनी भाजपला इशारा दिला होता. दरम्यान अशोक चव्हाण यांनी एकनाथ खडसेंना काँग्रेस मध्ये येण्याची ऑफर दिली.

याप्रसंगी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, एकनाथ खडसे एका व्यासपीठ उपस्थित होते. त्यामुळे व्यासपीठावर चांगलीच राजकीय चर्चा रंगली होती. यावर बोलतांना भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, म्हणाले एकनाथ खडसे भाजपचे ज्येष्ठ नेते आहेत. काही कारणांमुळे त्यांना पदावरून दूर व्हावे लागले होते. त्यांनी स्वतःहून पदाचा त्याग केला. यातील बऱ्याचशा प्रकरणांच्या चौकशीतून ते बाहेर पडले आहेत. त्यातून पूर्णपणे बाहेर पडल्यानंतर त्यांना सन्मानाने पक्ष पूर्णपणे मदत करेल.

भाजपमध्ये खंत असल्याचे खडसेंनी म्हटले होते त्यावर अशोक चव्हाण यांनी एकनाथ खडसेंना काँग्रेस मध्ये येण्याची ऑफर दिली. दानवे म्हणाले, मला वाटते ज्यांनी खडसेंच्या तोंडाला कान लावले त्यांनीच त्यांच्यावर आरोप केले होते. त्यांना खडसेंबद्दल बोलण्याचा नैतिक अधिकार नाही. खडसेंनी एकेकाळी विधानसभेत कॉंग्रेस राष्ट्रवादी कॉंग्रेसचे वाभाडे काढले होते, त्यांनीच आरोप करून खडसेंना पदावरून दूर करा, असे सांगितले होते. तेच आता खडसेंबाबत खंत व्यक्त करतात. खडसेंची सुरू असलेली चौकशी संपल्यावर ते भाजपच्या मुख्य प्रवाहात सामील होतील. असे दानावेनी स्पष्ट केले.

You might also like
Comments
Loading...