तुफान थंडावणार; ख्रिस गेलची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा

टीम महाराष्ट्र देशा – वेस्ट इंडिजचा स्टार क्रिकेटपटू ख्रिस गेल याने वर्ल्ड कप २०१९ नंतर एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. वेस्ट इंडिजची इंग्लंडविरुद्ध एकदिवसीय सामन्यांची मालिका सुरु होणार आहे. त्याच्या सराव सत्राआधी रविवारी गेलने ही घोषणा केली.

इंग्लंडविरुद्ध घरच्या मैदानावर होणाऱ्या वन डे मालिकेत गेलला संघात स्थान देण्यात आले होते. पहिल्या दोन वन डे सामन्यासाठी तो विंडीज संघाचे प्रतिनिधित्व करणार आहे. जुलै 2018नंतर तो राष्ट्रीय संघाचे प्रतिनिधित्व करणार आहे.

गेलने आपल्या क्रिकेटच्या तुफानी कारकीर्दीत आता पर्यंत २८४ वनडे आतंरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. तर आपल्या तुफानी खेळसीने गेलने २३ शतक तर ४९ अर्धशतके झळकावली आहेत. याचबरोबर त्याच्या नावावर व्दिशतकाची देखील नोंद आहे. झिब्बाबेच्या विरूध्द झालेल्या २०१५ च्या विश्वचषकामध्ये गेलने हे व्दिशतक झळकावले होते