आणि चंद्रकांत दादांनी रेल्वे प्लॅटफॉर्मवरच मांडली बैठक

chnadrakat patil

मुंबई: राज्य मंत्रिमंडळात क्रमांक दोनचे मंत्री असणारे महसूलमंत्री चंद्रकांत दादा पाटील हे आपल्या साधी राहणीमुळे ओळखले जातात. त्याचं अजून एक नवीन रूप सध्या सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे. झाल अस कि चंद्रकांत दादा हे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरून रेल्वेने कोल्हापूरला निघाले होते. तेवढ्यात एक अधिकारी काम घेवून आले. त्या अधिकाऱ्याला महत्वाच्या कागदपत्रावर चंद्रकांत पाटील यांची सही हवी होती. मात्र, रेल्वे स्टेशनवर सही कशी घेयची या गोंधळात अधिकारी असतानाच चंद्रकांत दादांनी जवळ पडलेल्या गाठोड्यावरच बैठक मारली.

गाठोड्यावर बसत त्यांनी सर्व कागदपत्रे वाचून काढली आणि सही केली. चंद्रकांत दादा यांचा गाठोड्यावर बसलेला हाच फोटो सध्या सोशलमिडीयावर व्हायरल होत आहे. मात्र त्यांनी केलेली हि कृती हि ज्याला खरच काम करण्याची इच्छा असते त्याला वेळेच आणि ठिकाणाच बंधन नसत हे दाखवणारी आहे.