fbpx

आम्ही विखेंना विकत घेऊ अथवा फुकट, तो आमचा विषय  –  चंद्रकांत पाटील

टीम महाराष्ट्र देशा –‘आम्ही विखेंना विकत घेऊ अथवा फुकट, तो आमचा विषय आहे’. अशा शब्दात खासदार राजू शेट्टी यांनी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी प्रतिउत्तर दिले आहे.
खासदार राजू शेट्टी यांनी विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे-पाटील यांचे चिरंजीव सुजय पाटील यांना विकत घेतल्याची टीका केली. यावर चंद्रकांत पाटील चांगलाच उत्तर दिल आहे. चंद्रकांत पाटील म्हणाले की,”आम्ही विकत घेऊ अथवा फुकट, तो आमचा विषय आहे. तुम्ही मांगितलेल्या दोन लोकसभेच्या जागा तरी तुम्हाला मिळाल्या का? याचे पहिले उत्तर द्या असेही ते यावेळी म्हणाले.
पाटील पुढे म्हणाले की, आता शेट्टींनी एकाच जागेवर समाधान मानावे लागणार आहे, याची काळजी करा. हातकणंगलेतही महायुतीला पोषक वातावरण आहे. ”सांगलीत विशाल पाटील यांच्या बंडखोरीमागे तुमचा हात आहे काय, या प्रश्‍नावर श्री पाटील म्हणाले, माझा सर्वच ठिकाणी हात असतो. कोणत्याही चांगल्या कामात माझा हात असतोच.”
सांगली लोकसभा मतदार संघातून भाजपचे उमेदवार म्हणून खासदार संजय पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.