भाजपला ‘अब की बार लांबूनच नमस्कार’- चित्रा वाघ

टेंभुर्णी: हल्लाबोल यात्रेचा चौथा टप्पा पश्चिम महाराष्ट्रात सुरु असून राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या महिला आघाडीच्या अध्यक्ष चित्राताई वाघ यांनी सरकारवर टीकास्त्र सोडले आहे. ‘अब की बार लांबूनच नमस्कार’ म्हणण्याची वेळ या सरकारने आणली आहे. राज्य टोलमुक्त करू, राज्य खड्डेमुक्त करू असे आश्वासन सरकारने दिले होते. रस्त्यात खड्डे आहेत की खड्ड्यात रस्ता आहे हेच कळत नाही.

bagdure

वाघ समोर म्हणाल्या, छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव घेऊन हे सरकार आले मात्र महिलांना सुरक्षा देत नाही. जर छत्रपती शिवाजी महाराज असते तर आज त्यांनी यांचा कडेलोट केला असता. अशी टीका चित्राताई वाघ यांनी केली.

You might also like
Comments
Loading...