दातृत्ववान भावाला राखी बांधल्याने आजचा दिवस अविस्मरणीय : चित्रा वाघ

टीम महाराष्ट्र देशा : सोलापूर जिल्ह्यातील जुळे येथे जामगुंडी मंगलकार्यालय भारतीय जनता पार्टीने रक्षाबंधन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी सुभाष देशमुख यांना राखी बांधुन कार्यक्रमाला सुरुवात केली. या कार्यक्रमात ओवाळनी म्हणून प्रत्येक महिलेला माहेरचा वाण व साडी भेट देण्यात आली.

या कार्यक्रमात बोलताना चित्र वाघ यांनी आजपर्यंत सुभाष बापूंच्या कामाबद्दल ऐकल होत पण दोन दिवस त्यांचे सर्व कार्य प्रत्यक्ष पाहिले. आणि मागील कित्येक दिवस ते पूरग्रस्त महिलांची कुटुंब उभारण्यात सांगलीत व्यवस्था करत होते. सांगलीत पूरस्थितीने हाहाकार माजला असुन भाजप सरकार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच सुभाष बापू देशमुख हे त्यांना मदतकार्य देण्यास सक्षम आहेत असं विधान केले.

पुढे बोलताना पुनर्वसनासाठी संस्थांनी पुढाकार घेऊन गावे दत्तक घेण्याचे आवाहन करणारे बापू हे त्यांचे जनक आहेत असे मत चित्रा वाघ यांनी यावेळी व्यक्त केले. राजकीय कार्यक्रम होत राहतात, परंतू रक्षाबंधन हा महिलेच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. लोकमंगल परिवाराच्या माध्यमातून त्यांनी फक्त उपक्रम न राबवता प्रत्येकांना अविरतपणे सहकार्य करत सामाजिक भान जपले आहे. आज दातृत्ववान भावाला राखी बांधायला आले असून अजचा हा क्षण कधीचं विसरणार नाही असेही त्या म्हणाल्या.

दरम्यान, २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रचार करत असतानाचा अनुभव त्यांनी यावेळी कथन केला. महिलांना भेटल्यानंतर सकारात्मक प्रतिसाद मिळूनदेखील राष्ट्रवादीला मतदान का पडले नाही याचे कोडे पुढे जाऊन उलगडले ते म्हणजे उज्वला गॅस योजना पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांनी कुटुंबांच्या गरजा ओळखून काम केले आहे. भाजप प्रवेशानंतर पहिल्यांदाच मोठ्या जनसमुदायाला संबोधण्याची वेळ आहे असे भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी आवर्जुन सांगितले.