‘चाकणकरांना मी शुर्पणखा म्हणाले नाही; रावणाला वाचवणारी शुर्पणखा अध्यक्ष नको एवढंच म्हटलंय’

'चाकणकरांना मी शुर्पणखा म्हणाले नाही; रावणाला वाचवणारी शुर्पणखा अध्यक्ष नको एवढंच म्हटलंय'

मुंबई : भाजप नेत्या चित्रा वाघ यांची आज पत्रकार परिषद पार पडली. त्यात त्यांनी विविध मुद्यावर भाष्य केले.आज वाघ यांनी आपल्या ट्वीटर वरून एक पोस्ट केली ज्यात त्यांनी ‘अध्यक्ष लवकर नेमावा पण महिलांच्या क्षेत्रात काम करणारी कोणी अनुभवी मिळत नसेल तर किमान रावणाला मदत करणारी शुर्पणखा बसवू नका,अन्यथा प्रत्येकवेळी सरकारचंच नाक कापलं जाईल’ अशी मार्मिक पद्धतीने विरोधकांवर टीका केली होती.

आज केलेल्या वक्तव्यावर मी रुपाली चाकणकर यांना शुर्पणखा म्हटलेले नाही असे आज पत्रकार परिषदेत सांगितले.पुढे वाघ म्हणाल्या ‘राज्यात महिलांवरील अत्याचारात वाढ झालेली आहे. राजकीय रावणही राज्यात फिरत आहेत विशेष म्हणजे सत्ताधारी पक्षातील आमदार , मंत्री , आणि त्याचे बगलबच्चे असतील त्यांच्यावर किती केसेस पेंडिंग आहेत. त्यामुळे अशा रावणांना वाचवणाऱ्या शूर्पणखा महिला आयोगाच्या अध्यक्षपदी नकोत असं मी म्हटलंय असं त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असताना बलात्कार पीडित महिलेला आपल्या घरी ठेऊन त्याबदल्यात भाजपच्या एका आमदाराकडून चित्रा वाघ यांनी खंडणी वसूली करण्याचा प्रयत्न केला होता, असा आरोप राष्ट्रवादीच्या नेत्या विद्या चव्हाण यांनी केला होता. या आरोपाचा देखील समाचार चित्रा वाघ यांनी या पत्रकार परिषदेत घेतला. त्या म्हणाल्या,  बोलताना तुम्ही माझ्यावर वैयक्तिक बोलतात तरीही मी सगळ्या गोष्टी खपवून घेते, पण तुम्ही माझ्या कामावरती प्रश्नचिन्ह उभं करालं तर ते चित्रा वाघ कधीही खपवून घेणार नाही. आजही ती मुलगी माझ्या संपर्कात आहे. विद्या चव्हाणांनी सिद्ध करुन दाखवावं. चव्हाण यांचे आरोप जर खरे ठरले तर मी राजकारणातून निवृत्ती घेईल असेही त्या म्हणाल्या.

महत्त्वाच्या बातम्या