पुणे : पुण्यात रेल्वे स्थानक परिसरातून एका 14 वर्षीय अल्पवयीन मुलीचे अपहरण करून रेल्वेतील दोन कर्मचारी तसेच रिक्षा चालकांनी तिच्यावर सामूहिक बलात्कार केल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. पोलीसांनी आठ आरोपींना अटक केली आहे. याप्रकरणी पुण्यातील वानवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत 14 वर्षीय पिडीत मुलीने तक्रार दिली आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिडीत मुलगी 31 ऑगस्ट रोजी गावी जाण्यासाठी पुणे रेल्वे स्थानक परिसरात आली होती. रात्री तिला आरोपींनी आता गाडी नाही. गावी कशी जाणार असे म्हणत आम्ही तुझी राहण्याची व्यवस्था करतो, असे सांगून बाहेर आणले. तिचे अपहरण करून तिला वानवडी परिसरात नेले. त्या ठिकाणी आरोपींनी रात्री तिच्यावर बलात्कार केला. तसेच, दुसऱ्या दिवशी देखील तिच्यावर बलात्कार करण्यात आला. एकूण सात आरोपींनी तिच्यावर बलात्कार केला. विशेष म्हणजे हे नराधम तिच्यावर तब्बल पाच दिवस बलात्कार करत होते अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे.
दरम्यान, या प्रकरणावर आता भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी संताप व्यक्त केला आहे. त्या म्हणाल्या, पुण्यातल्या वानवडी येथील १४ वर्षीय लेकीवर अंगाचा थरकाप उडेल असा सामूहिक पाशवी अत्याचार झालाय. मुलीवर उपचार सुरु असून ती गंभीर आहे रिक्षाचालक तिला रिक्षातून नेतो काय पुढे ५-६ रिक्षा चालक पाशवी अत्याचार करतात २ रेल्वेचे कर्मचारीही त्यात सहभागी होतात..आरोपींना पुणे पोलिसांनी अटकही केलीय. राज्यात अत्याचारांची परिसीमा झालीये. एकीकडे गृहविभागाचा काडीचाही वचक न राहिलेल्या आणि दुसरीकडे मेहबूब सारखे बलात्कारी मोकाट वावरत असल्याने आम्ही ही असेचं बाहेर येऊन फिरू शकतोयं हे निर्ढावलेपणं विकृतांना आलंय हे नक्की असं म्हणत त्यांनी आपला रोष व्यक्त केला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- तिन्ही कृषी कायदे रद्द करावेत हीच राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची भूमिका आहे – मलिक
- देशाला अग्रेसर करण्यासाठी सर्वांना सोबत प्रयत्न करावे लागतील – सरसंघचालक
- अण्णासाहेब पाटील महामंडळाला तातडीने १०० कोटी रुपये द्या; नरेंद्र पाटील यांची मागणी
- ‘मोहन भागवत यांच्या ‘त्या’ वक्तव्यावर शरद पवार म्हणाले..’
- ईडीने हस्तक्षेप करणं एका अर्थानं राज्यांच्या अधिकारांवर गदा आणणं; शरद पवारांची टीका