व्यक्तिगत आयुष्याचा मुद्दा बनवणारी ‘ही’ मंडळी भ्याडच, चित्रा वाघ यांचा चाकणकरांवर घणाघात

rupali chakankar chitra wagh

मुंबई : उच्च न्यायालयाने माजी गृहमंत्री अनिल देशमुखांविरोधात दाखल करण्यात आलेल्या विविध याचिकांवर झालेल्या सुनावणी दरम्यान त्यांची सीबीआय चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. यामुळे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आपल्या गृहमंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे.

परंतु त्यानंतर खरे महाराष्ट्रामध्ये राजकीय वातावरण तापायला सुरुवात झाली आहे. राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी अखेर राजीनामा दिला. पण आता प्रश्न उरतो की, नवा वसुली मंत्री कोण?, असा खोचक सवाल भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी उपस्थित केला होता. मंत्रिमंडळातील एखादा चेहरा बदलल्याने महाविकास आघाडी सरकारचा भ्रष्ट हेतू काही बदलणार नाही, अशी टीका देखील चित्रा वाघ यांनी केली होती.

त्यानंतर, राष्ट्रवादी काँगेसच्या नेत्या रुपाली चाकणकर यांनी चित्रा वाघ यांच्यावर पलटवार केला आहे. ताईचा नवरा स्वत: भ्रष्टाचाराच्या गुन्ह्यात अडकलेला आरोपी असून त्यांच्यावर रीतसर गुन्हा दाखल आहे आणि ताई विचारत आहेत, नवीन वसुली मंत्री कोण? असा खोचक टोमणा चाकणकर यांनी चित्रा वाघ यांना लगावला. तसेच, अहो ताई… भावनेच्या भरात इतकंही वाहून जाऊ नका की, अंलगट आलं की पुन्हा पवारसाहेब माझ्या वडिलांसारखेच आहेत हे म्हणायची वेळ येईल. थोडा धीरज रखो, सब सच सामने आयेगा… असे टोलाही चाकणकर यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून लगावला आहे.

आता कधीकाळी एकाच पक्षात सहकारी असणाऱ्या चित्रा वाघ आणि रुपाली चाकणकर यांच्यात जोरदार खटके उडायला सुरवात झाली आहे. ‘अन्यायाविरोधात आवाज उठवल्यानंतर व त्यातही आवाज उठवणारी जर स्त्री असेल तर व्यक्तिगत आयुष्याचा मुद्दा बनवणारी “ही”मंडळी भ्याडच म्हणावी लागतील सूडाच्या भावनेतून होणारं राजकारण फार काळ टिकणारं नाही हे लक्षात ठेवा, असं ट्विट चित्रा वाघ यांनी केल आहे. या ट्विट मधून चित्रा वाघ यांनी चाकणकर यांचे नाव न घेता जोरदार टोला लगावला आहे.

महत्वाच्या बातम्या