आदिवासी महिलांना पोलिसांनी केलेल्या मारहाणी प्रकरणी चित्रा वाघ वसईकडे रवाना

आदिवासी महिलांना पोलिसांनी केलेल्या मारहाणी प्रकरणी चित्रा वाघ वसईकडे रवाना

चित्रा वाघ

वसई : चोर समजून पोलिसांनी वसईच्या ग्रामीण भागातील आदिवासी महिलांना मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेनंतर आदिवासी लोकांमध्ये पोलिसांविरोधात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. मात्र आद्यपपर्यंत या पोलीस कर्मचाऱ्यांविरोधात कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही.

या महिलांना तेथील काही नागरिकांनी या चोरी करण्यासाठी आल्याची माहिती पोलिसांना दिली. यावेळी पोलिसांनी त्यांना रिक्षात बसवून पापडी चौकीत नेले. येथील सहायक पोलीस निरीक्षक वाघ आणि एका पोलीस कर्मचाऱ्याने त्यांना दांडुक्याने मारहाण करत चोरीचा आरोप लावला असल्याचे आदिवासी महिला सांगत आहेत. या संपूर्ण प्रकरणानंतर भाजप नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी या पोलिसांविरोधात कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे.

यानंतर आता चित्रा वाघ या घटनेला विरोध करत स्वत: आज दुपारी २:३० वाजता डिसीपी कार्यालय वसई(प.)येथे पोहचणार असल्याची माहिती दिली आहे. या आदिवासी महिलांची काहाही चूक नसताना त्यांना ज्या पद्धतीने मारहाण करण्यात आली ते चुकीचे असल्याचे म्हणत चित्रा वाघ वसईमध्ये दाखल होत आहे. तसेच त्या या संपूर्ण प्रकारणाची माहिती घेणार आहेत. दरम्यान, संबंधित पोलिसाचं तात्काळ निलंबन करावं आणि संविधान दिनी तरी राज्य भीमाच्या कायद्यानं चालतंय हे दाखवून द्यावं, असे देखील ट्विट करत चित्रा वाघ ट्विट करत म्हणाल्या आहेत.

महत्वाच्या बातम्या