Chitra Wagh | मुंबई : संभाजी भिडे यांनी काही दिवसांपुर्वी एका महिला पत्रकाराला कुंकू लाव मग बोलेल असं म्हणत वातावरण तापवलेलं होतं. यावर प्रतिक्रिया देताना राष्ट्रवादी (NCP) खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी देखील त्यांची पाठराखण केली होती. यालाच आता भाजप (BJP) नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी प्रत्युत्तर दिलं होतं.
यावेळी, माझं भाषण नीट ऐका, एकूण 35 मिनिटांचं भाषण होतं. माझी विनंती आहे की, पूर्ण ऐकावं. थोडा वेळ पाहून ऐका त्यात मी काय म्हटलं. मी सविधानावर विश्वास ठेवणारी आहे. माझ्यावर टीका करण्याचा अधिकार आहे, ते आमचे विरोधक करत आहे. ते आमचं काही कौतुक करणार नाही. त्यांनी फार टीका केली त्या त्याबद्दल काही वाटत नाही. माझी आई नेहमी सांगते निंदकाचे घर हे शेजारी असावे, ते विरोधक काम पूर्ण करत आहे. आज टेक्नॉलाजी वाढली आहे. पण त्याचा गैर वापर होत आहे. जर 35 मिनिटांचं भाषण हे 17 सेकंदाचं सांगत असेल तर त्यांना माझ्या शुभेच्छा आहे, अशा टोला चित्रा वाघ यांनी सुप्रिया सुळेंना लगावला आहे.
दरम्यान, चॅनलमधल्या मुली साडी का नाही नेसत? शर्ट आणि ट्राऊजर का घालतात? मराठी भाषा बोलताना? मग मराठी संस्कृतीसारखे कपडे आपण का नाही घालत? आपण सगळ्या गोष्टींचं वेस्टर्नायझेशन करतोय, अशी प्रतिक्रिया सुप्रिया सुळे यांनी दिली होती.
महत्वाच्या बातम्या :
- IND vs NZ | सामन्यापूर्वी न्युझीलँडला मोठा धक्का, केन विल्यमसन सोडून ‘हा’ खेळाडू करणार संघाचे नेतृत्व
- N Jagadeesan | CSK ने सोडल्यानंतर एन जगदीशनने एकाच डावात केले ‘हे’ तीन विश्वविक्रम
- Ambadas Danve | “राज्यपाल कोश्यारी यांना पाणी पाजल्याशिवाय गप्प बसणार नाही”, अंबादास दानवेंचा इशारा
- Bhagat Singh Koshyari | “अशांना राज्यपाल पदावर ठेवून उपयोग नाही…” ; शिंदे गटातील आमदाराची खोचक टीका
- Sambhajiraje Chhatrapati | “फडणवीसांकडून त्रिवेदींच्या विधानाची पाठराखण का?”; संभाजीराजेंचा संतप्त सवाल